पारिवारिक कलह वाढणार तर काही राशी ना आर्थिक भार: वाचा आजचे राशी भविष्य

0
42

मेष- आज पारिवारिक कलह होण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळावे. महत्वपूर्ण कामासाठीच्या यात्रा शक्यतो टाळाव्यात. व्यर्थ खर्च टाळावा. आजचा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी काहीसा प्रतिकूल असेल.
आज मेष राशीसाठी शुभ अंक 5, शुभ रंग लाल.

वृषभ- आजचा दिवस वृषभ राशीसाठी अनुकूल असेल, भागेदारीत यश प्राप्त होऊ शकते. कोर्ट कचेरीच्या कामासाठी ही अनुकूल दिवस आहे. नातेवाईकांना उसने दिलेले पैसे मागण्यासाठी आज चांगला दिवस आहे. मात्र आज आपल्याला रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराची आज काळजी घ्या व सन्मान करा. शुभ अंक 8, शुभ रंग फिक्कट हिरवा.

मिथुन- आज आपला दिवस ऊर्जावान असेल, व्यस्थ असेल. आज अहंकार करणे टाळावे. कुटुंबातील आधीच्या काही समस्या असतील तर त्या आज मिळून सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यापारी वर्गासाठी ही दिवस चांगला आहे. मनात दडवून ठेवलेल्या भावना मनात न ठेवता आज बोलून दाखवा व्यक्त व्हा. विवाह प्रस्ताव येवू शकतो पूर्वी पासून काही आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक 8, शुभ रंग काळा.

कर्क- आजचा दिवस आपल्यासाठी काल पेक्षा ठीकठाक असेल. कुटुंबाकडून सहयोग प्राप्त होईल. कुठल्या मोठ्या समारंभासाठी जाणार असाल आणि जाणे अगदीच आवश्यक असेल तरच जावे अन्यथा टाळावे. आज अधिक मेहनत करावी लागेल. व्यापारात नवीन काही सुरू करायचे असेल तर अत्यंत विचारपूर्वक करावे. पैसे कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक 3, शुभ रंग गुलाबी.

सिंह- आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असेल बऱ्याच दिवसांपासून जे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते ते आज पूर्ण होऊ शकते. मेहनतीचे फळ मिळतांना दिसत आहे. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असेल. घराची किंवा वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी ही अनुकूल दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांवर क्रोध करणे टाळावे. प्रेम संबंधात नात्यात जवळीकता वाढेल जुने वाद मिटतील.
पोटाचे दुखणे उद्भवू शकतात.
शुभ अंक 8 शुभ रंग शेंदूरी.

कन्या- आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अनुकूल व आनंददायी आहे. धनलाभ होईल. अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. आज आपला दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असेल.आज घेतलेले बहुतेक निर्णय योग्य ठरतील. आपल्या परिवारास वेळ देण्याचा प्रयत्न करा. व्यापारी वर्गासाठी दिवस उत्तम आहे त्याचा सदुपयोग करावा. महत्त्वाची कामे आजच करून घ्या. आज काहींना डोकेदुखी ची समस्या होऊ शकते.
शुभ अंक 2 शुभ रंग बदामी.

तुला- आज आपला दिवस उत्साहवर्धक असेल, ऊर्जावान असेल, उत्तम असेल. आत्मविश्वास वाढेल.शुभ समाचार प्राप्त होईल. बऱ्याच दिवसांपासून घर परिवारा संबंधित कुठली समस्या होती ती दूर होतांना दिसत आहे. व्यापारी वर्गासाठी ही अत्यंत लाभदायक दिवस आहे परंतु सावधानी पूर्वक निर्णय घ्यावा. मनात असलेल्या कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे.
प्रेमसंबंधा साठी दिवस चांगला आहे, आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
शुभ अंक 6, शुभ रंग मरुन.

वृश्चिक- आजचा दिवस आपल्यासाठी मानसिक अशांती देणारा असेल. कुठलीही मोठी खरेदी करू नये. कुणाला धन उधार देवू नये. आपल्या मनातील आयडिया कुणाला सांगू नये, व्यर्थ खर्च करणे टाळावे. व्यापारी वर्गाने सावधानी पूर्वक व्यवहार करावे दिवस काहीसा प्रतिकूल आहे. प्रेम संबंधा संदर्भात आज चा दिवस तितका चांगला नाही, वादविवाद होऊ शकता.
मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो
शुभ अंक 2 शुभ रंग पांढरा.

धनु- आज व्यापारात मोठी डील करणे टाळा. देवाण घेवणीस दिवस अनुकूल नाही. पूर्वी अडकलेलं धन मिळण्यासाठी प्रयत्न करू शकता. पारिवारिक जीवनात चिंता, तणाव जाणवू शकतो. गैरकारभार आज करू नये, ऑनलाइन कुठले चुकीचे कार्य करू नये. जोडीदाराची साथ लाभेल. मद्यपान मांसाहार टाळावा. व्यापारी वर्गाने आज उधार देण्याआधी नीट विचार करावा. प्रेमी, प्रेमिकां मध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक 2 शुभ रंग केसरी.

मकर- आज चा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे, शुभ समाचार प्राप्त होईल. प्रवास,यात्रा लाभदायी ठरतील, कुठलाही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस उत्तम आहे. प्रत्येक बाबतीत दिवस अत्यंत शुभ आहे, व्यापारी वर्गासाठी दिवस उत्तम आहे, आपल्या मनातील गोष्टी कुणाजवळ सांगतांना काळजी घ्या की तो/ती कुठे ह्याची वाच्यता करणार नाही. प्रेमीं प्रेमिकांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 1 शुभ रंग आकाशी

कुंभ- आपल्या साठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. पूर्वी ठरवलेली कामे पूर्ण होतांना दिसत आहे.
केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ आज मिळण्याची शक्यता आहे. पूर्वनियोजित कार्य करण्यास अनुकूल परिस्थिती आहे. व्यापारी वर्गासाठी शुभ दिवस आहे कुठला महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा असल्यास आज घेऊ शकता. परंतु घाई घाई कुठलेही कार्य करू नये. प्रेमीं, प्रेमिकांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 2 शुभ रंग मजेंठा.

मीन- आपल्यासाठी कालच्या तुलनेत आजचा दिवस काहीसा चांगला आहे, आलेल्या संधीचा विचारपूर्वक निर्णय घेऊन फायदा घ्या. हळूहळू आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. नवीन संधी मिळू शकते त्याचाही विचारपूर्वक फायदा घ्यावा, कुठल्यातरी मित्र/मैत्रिणी मुळे आपल्या कौटुंबिक कलहातुन मार्ग निघेल. मित्र मैत्रिणीं सोबत चांगला वेळ घालवाल. व्यापारी वर्गास मेहनतीने फळ मिळेल,लाभ होईल. दीर्घकालीन योजना बनवा घाईघाईने कार्य करणे टाळा. प्रेम संबंधात वाद विवाद उत्पन्न होऊ शकतात.
परंतु रात्री पर्यंत हळूहळू समस्या कमी होतील.
शुभ अंक 6 शुभ रंग निळा.

ज्योतिषशास्त्री
शशीसुत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here