मेष (Aries) : शारीरिक समस्येमुळे कामावर दुष्परिणाम होऊ शकतो. वडिलधाऱ्या मंडळींचे शब्द बोचू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे.
लकी नंबर : 7
लकी कलर : Sky Blue
उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.
वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी भरपूर कष्ट करावे लागतील. भविष्यात त्याचे परिणाम सुखद असतील. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. एखाद्या गंभीर विकारातून सुटका होईल. तुमच्याशी संबंधित एखाद्या गोष्टीवरून वाद तीव्र होऊ शकतील.
लकी नंबर : 5
लकी कलर : Yellow
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
मिथुन (Gemini) : कामात यशस्वी झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल, तुम्हाला प्रेरणा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमची बार्गेनिंग व्हॅल्यू वाढू शकेल. जुन्या मित्रांशी भेट होणं शक्य आहे. वैवाहिक जीवनात ऊर्जा असेल.
लकी नंबर : 4
लकी कलर : Badami
उपाय : पंचामृताने शिवशंकरांना अभिषेक करा.
कर्क (Cancer) : बिझनेस डील्समध्ये नफा होईल. अडकलेले पैसे परत मिळाल्याने आनंदी व्हाल. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. एका वेळी दोन गोष्टी करू नका. कुटुंबात उत्सवी वातावरण असेल.
लकी नंबर : 2
लकी कलर : Turquoise-blue
उपाय : वडिलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेऊनच घरातून बाहेर पडा.
सिंह (Leo) : प्रिय व्यक्तींचे शब्द मनाला टोचू शकतील. शारीरिक समस्या वाढू शकतील. रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटणं स्वाभाविक आहे; मात्र संयम बाळगावा. आर्थिक तोट्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा.
लकी नंबर : 8
लकी कलर : White
उपाय : ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा 108 वेळा जप करा.
कन्या (Virgo) : एकापाठोपाठ एक समस्या उद्भवत राहील. आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकेल. शहाणपणाने/विचारपूर्वक खर्च करा. अनपेक्षित तोट्याची शक्यता तयार होत आहे. कुटुंबाला सहकार्य मिळेल.
लकी नंबर : 5
लकी कलर : Green
उपाय : श्रीरामाच्या मंदिरात बसून रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.
तूळ (Libra) : सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. बदलाची चिंता वाटेल. भावांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून ताण वाढेल. बराच काळ अडकलेले पैसे सहजपणे परत मिळवता येतील.
लकी नंबर : 2
लकी कलर : Blue
उपाय : श्री हनुमानासाठी तुपाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसा पठण करा.
वृश्चिक (Scorpio) : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस खास असेल. नफ्याचीही शक्यता आहे. आज एखादं खास डील फायनल होईल. चांगल्या आकारात राहा. प्रिय व्यक्तींशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा.
लकी नंबर : 6
लकी कलर : Green
उपाय : भैरव मंदिरात मिठाई अर्पण करा.
धनू (Sagittarius) : दीर्घ काळासाठी स्थलांतर करण्याचं नियोजन करत असलेल्या व्यक्ती यशस्वी होतील. क्षमतेत वाढ होईल. आर्थिक लाभ मिळण्याची तीव्र शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल.
लकी नंबर : 2
लकी कलर : Sky Blue
उपाय : श्री दुर्गा मंदिरात दुर्गा चालिसा पठण करा.
मकर (Capricorn) : आज तुमच्या मनात काही प्लॅन्स येतील, त्यातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. कामामध्ये कोणा वरिष्ठ व्यक्तीची मदत घेण्याचा प्रयत्न करा. वडिलधाऱ्यांचा आदर करा. कौटुंबिक समस्या बोलून, संवादातून सोडवल्या पाहिजेत.
लकी नंबर : 7
लकी कलर : Light Pink
उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा आणि गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा.
कुंभ (Aquarius) : आज तुम्ही जे काही काम समर्पण भावनेने कराल, त्याची फळं तुम्हाला लगेच मिळतील. विचारपूर्वक काम करा. आर्थिक तोट्याची शक्यता. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतील.
लकी नंबर : 9
लकी कलर : Saffron
उपाय : भगवान श्रीकृष्णाला साखर अर्पण करा.
मीन (Pisces) : आज तुमचं चित्त काहीसं विचलित राहील. ताण दूर करण्यासाठी तुम्ही छोट्या ट्रिपला जाऊ शकता. त्यातून आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासमवेत पूर्ण वेळ व्यतीत कराल.
लकी नंबर : 3
लकी कलर : Light Yellow
उपाय : मोहरीचं तेल लावलेली चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम