नाशिक जिल्ह्यात 24 कोरोना नवे रुग्ण ; चिंता कायम

0
14

नाशिक ; नाशिक शहरात कोरोना पुन्हा डोकावत असून जिल्हा प्रशासन देखील अलर्ट आहे. प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात २४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील 14 रुग्ण, तर ग्रामीण भागातील ७ रुग्ण व, जिल्हाबाह्य ३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसल्याने दिलासा दायक वृत्त आहे. (Death of Corona Patients). जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आजपर्यंत ८ हजार ८९९ इतकी आहे. आजचे एकूण उपचाराखालील ११२ रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी करोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here