आज नासाचे डार्ट हे (DART) अंतराळयान एका चाचणीसाठी फुटबॉल स्टेडियम इतक्या लघुग्रहाशी करेल क्रॅश….

0
34

द पॉईंट नाऊ: शेवटी तो दिवस आला आहे, जेव्हा NASA (National Aeronautics and Space Administration) आपल्या तंत्रज्ञानाची अनोख्या पद्धतीने चाचणी करेल. डार्ट हे अंतराळयान पृथ्वीचे रक्षण करू शकते की नाही हे शोधून काढण्यासाठी ही मोहीम राबवली आहे ते लघुग्रह किंवा धूमकेतूंपासून पृथ्वीचे रक्षण करू शकते की नाही हे जाणून घेण्याकरता ते लघुग्रहाच्या दिशेने वेगाने जाणार आहे. नासा त्याच्या दुहेरी लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी (DART) मोहिमेअंतर्गत आज, २६ सप्टेंबर रोजी संरक्षण यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी डिमॉर्फोस नावाच्या लघुग्रहावर एक अंतराळयान क्रॅश करणार आहे. DART हे गतिज प्रभावाने लघुग्रहांचे विक्षेपण प्रदर्शित करणारी पहिली अंतराळ मोहीम ठरेल. तसेच, संपूर्ण कार्यक्रमाचे NASA द्वारे थेट प्रक्षेपण केले जाईल आणि जगभरातील लोक ते ऑनलाइन थेट पाहू शकतात. DART हे काइनेटिक इम्पॅक्टरद्वारे #asteroid deflection चे प्रात्यक्षिक करणारी पहिली अंतराळ मोहीम बनेल.

नासाने दिलेल्या माहितीनुसार DART अंतराळयान त्याचा वेग आणि मार्ग बदलण्यासाठी जाणूनबुजून लघुग्रह डिमॉफसशी टक्कर देईल. नासाने याआधी ट्विट केले आहे की, आज २६ सप्टेंबर रोजी, DART जाणूनबुजून डिमॉर्फोस, डिडिमॉसचा लघुग्रह चंद्रमावर धडकेल. लघुग्रह पृथ्वीला कोणताही धोका नसला तरी, गतीशील प्रभाव तंत्राची ही जगातील पहिली चाचणी आहे, ज्यात अंतराळ यानाचा वापर करून विक्षेपण केले जाईल. डार्ट या अंतराळयानाला नासाने ग्रहांच्या संरक्षणासाठीचा लघुग्रह असेही संबोधले आहे.

या ऐतिहासिक क्षणात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले. नासाने ट्विटर थेट प्रक्षेपण बघण्याकरिताच्या लिंक शेअर केल्या आहेत.

नासाचे DART मिशन: थेट ऑनलाइन कधी आणि कुठे बघता येईल

सोमवार, २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ET भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ३:३०(3:30 am, IST) नासाच्या DART लघुग्रह डिमॉर्फीसच्या प्रभावाचे थेट कव्हरेज NASA TV वर आणि फेसबुक, ट्विटर आणि युट्युब या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करेल. ७:१४ pm ET म्हणजेच भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ४:४४ (am 4:44 IST) वाजता अंतराळयान त्याच्या लक्ष्यित लघुग्रहावर परिणाम करेल, तर ८:०० pm ET भारतीय वेळेनुसार ५:३० (5:30 IST) वाजता, संशोधन संस्था पोस्ट-इम्पॅक्ट प्रेस ब्रीफिंग आयोजित करेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here