Pandharpur : आषाढी एकादशी तोंडावर येऊन पोहोचली आहे. याच निमित्ताने राज्यातील विविध ठिकाणाहून लाखो वारकरी हे पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात या वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी काही निर्देश दिले आहेत.
दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी संपन्न होत असते. मागील काही वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये खंड पडला असला तरी वारकऱ्यांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाही. यातच पंढरपुरात दाखल होणाऱ्या या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्षांकडून स्वागत फलक लावण्यात येतात मात्र कोणतेही राजकीय नेत्याच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स न लावता विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक पंढरपुरामध्ये लावावे असा आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पंढरपूर या ठिकाणी जाऊन वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांचा आढावा घेतला आणि काही वारकऱ्यांशी संवाद ही साधला होता. यात पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांच्या स्वागताचे बॅनर आणि पोस्टर्स लावल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी निमित्त राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येत असतात विठ्ठल रखुमाई हे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. यामुळे राजकीय पक्षांचे बॅनर लावण्यापेक्षा ठीक ठिकाणी विठू नामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत करणारे फलक पंढरपुरात लावण्यात यावे असं आवाहन करत त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत सुचवले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला त्यांनी यावेळी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम