Ahmednagar : आणि त्या शिक्षकाला निरोप देतांना संपूर्ण गाव ढसाढसा रडले…..

0
47

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भारजवाडी येथे बारा वर्षांपूर्वी लहू बोराटे यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम सुरू केले. यावेळी शाळेचा पट २० इतका होता. भाजरवाडी शाळा ऊसतोड मजूर कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जायची आज या शाळेमध्ये एकूण ५४ विद्यार्थी शिकतात.

लहू बोराटे फेब्रुवारी २०११ मध्ये शाळेत रुजू झाले. त्यानंतर बारा वर्षे त्यांनी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा पूर्ण केली आणि त्यांची १८ मे २०२३ ला हनुमाननगर शाळेमधून बदली झाली व त्यांना नव्याने धनगर वस्ती तालुका जामखेड या ठिकाणी रुजू व्हावे लागले. आपल्या बारा वर्षांच्या शिक्षक सेवेमध्ये त्यांनी शाळेचा पूर्ण कायापालट करून टाकलाय. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शाळा, हस्ताक्षर, व्याकरण स्पर्धा, हरित शाळा, तसेच शाळेच्या भिंतीवर 3d पेंटिंग करून पाळीव प्राणी, हिंस्र प्राणी तसेच विविध पक्षी व मुळाक्षरे रेखाटली. यामुळे विद्यार्थ्यांना खेळतानाही शिक्षण मिळायला सुरवात झाली. ही अनोखी संकल्पना त्यांनी शाळेमध्ये राबवली. गावातले तरुण, पालक, वयोवृद्ध त्यांच्या भरवशावर मुलांना घरी ठेवून ऊसतोडीसाठी गाव सोडून जात होते. यावेळी लहू सर हेच त्यांचे पालक बनायचे

यामुळे शाळेने फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये खूप वेळा आपले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे नाव कमावल. या शाळेमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेत. तर विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर असेल, कुठली क्रीडा स्पर्धा असेल, अभ्यास असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करत राज्यात आणि जिल्ह्यात अनेक बक्षीसही पटकावली आहेत.

लहू बोराटे सरांना नुकताच निरोप देण्यात आला. यासाठी पालक, आजी-माजी विद्यार्थी व बालानंद परिवार यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालक, माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, तसेच प्रदूषण आयुक्त दिलीपजी खेडकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रत्येकाच अंत:करण निरोपावेळी भरून आल होते. विद्यार्थ्यांचा आणि पालकांच्या भावनांचा महापूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एका प्राथमिक शिक्षकावर ग्रामस्थ इतकं प्रेम करू शकतात यावर तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. बारा वर्षांमध्ये या शिक्षकाने निस्वार्थपणे दिवस-रात्र एक करत शाळेसाठी आणि मुलांसाठी एक आदर्श शिक्षक म्हणून एक गुरु म्हणून अनेकांना मार्गदर्शन केल आहे. म्हणूनच येथील सर्व पालक, तरुण आणि चिमुकले मुल त्यांच्यावर अपार प्रेम करतात. आजपर्यंत शिक्षकाचा असा निरोप समारंभ कुणी केला नसेल असा या हनुमाननगर वस्तीवरील भारजवडी गावातील ग्रामस्थांनी या शिक्षकांना निरोप दिला. निरोप देताना सर्वच पालकांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाण्याच्या धारा वाहत होत्या. चिमुकली रडत होती. तर सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी, तरुण वर्ग आणि या परिसरातील सर्वच लोकांनी फुलांचा वर्षाव करत या शिक्षकांना निरोप दिला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here