लाल मिरचीचा जोरदार ठसका, दरात होणार २०-३० रुपयांची वाढ

0
24

उन्हाळयात मसाला बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु आहे. गृहिणींना यंदाच्या वर्षी मसाला बनवणे महागात पडणार आहे. गृहिणींना मसाल्यासाठी दुप्पट अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना देखील अवकाळी पावसामुळे झळ सहन करावी लागते आहे.

मिरची बाजारात गुंटूर मिरची 200 ते 230 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. तर आगामी दोन महिन्यात हे दर 200 ते 650 किलोंपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जानेवारी महिन्यापासून हिरव्या मिरचीचे उत्पादन कमी झाले लाल मिरचीच्या दरात वाढ झाली. अवकाळी पावसाचा फटका लाल मिरचीलासुद्धा बसला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात निघणार्‍या मिरचीची आवक घटली.

लाल मिरचीच्या बाजारात दर वाढीचा सामान्य नागरिक ठसका बसणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारपेठत मिरचीची आवक कमी झाली असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. सद्या बाजारात बेडगी मिरची 450 ते 460 रुपये प्रतिकिलो मिळत आहे.त्यामुळे कर्नाटक,मध्य प्रदेश, तेलंगणसह आदी राज्यांतून मिरची आयात करावी लागत आहे. लाल मिरची पावडर देखील महागणार आहे. कोल्हापूर येथून देखील मिरची निर्यात केली जाते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here