Gadchiroli : गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत सोहळ्यासाठी राष्ट्रपती राहणार उपस्थित…

0
15

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत सोहळ्यासाठी राष्ट्रपती दौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहे येत्या पाच जुलैला सोहळा पार पडणार आहे.

गडचिरोली येथे असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत सोहळ्यासाठी पाच जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच यावेळी विद्यापीठाच्या 177 एकर वर पसरलेल्या अडपल्ली येथील नव्या प्रशासकीय भवनाचे देखील त्यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. दीक्षांत सोहळा आणि उद्घाटन सोहळ्यासाठी विद्यापीठाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून जवळपास एक हजार लोक या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकतील, बसू शकतील असा भव्य मंडळ विद्यापीठाच्या परिसरात उभारला जात आहे.

राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे देखील सांगण्यात आल आहे. या दहाव्या दीक्षांत सोहळ्यामध्ये जवळपास 20,000 विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या जाणार आहेत. यात 78 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर 39 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी बहाल केली जाणार आहे.

आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये गोंडवाना विद्यापीठाने 2030 पर्यंत उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण 14 वरून 20 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट स्थापन केल आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यास या विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा मिळावा यासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर इतिहासामध्ये प्रथमच गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याने या सोहळ्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील रणनीती आखायला सुरुवात झाली असून कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपासूनच दिवसापासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here