Nashik news | नाशकात पोलिसच निघाला साखळी चोर

0
24

Nashik news | नाशिक शहरात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच आपल्या अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवार (दि. १२) रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा सर्व प्रकार घडला.

धक्कादायक म्हणजे ज्या मित्राच्या मदतीने ही चोरी यशस्वी झाली त्यानेच हा बोभाटा केल्यामुळे, हा प्रकार उहाडकिस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने संशयित पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. संशयित पोलिसावर यापूर्वीही लाच घेतल्याचा गुन्हा दाखल आहे.

 नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहर सरकारवाडा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश लोंढे असे या संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सध्या पोलिस मुख्यालय येथे त्याची नियुक्ती आहे.

१२ नोव्हेंबर रोजी त्र्यंबक रोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या मागील रस्त्याने एक महिला पायी जात होती. त्या वेळी आरोपी लोंढे हा एका सतरा वर्षीय मित्रासोबत मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून आला आणि त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

दरम्यान, काही अंतरावर जाताच त्याचे व मित्राचे वाद झाले. त्यामुळे संबंधित अल्पवयीन मुलाने पोलिसांना घडलेला हा प्रकार कळवला. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे निरीक्षक रणजित नलावडे यांनाही यासंबंधी माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी लोंढे याला ताब्यात घेतले आहे. तो पोलिस शिपाई असल्याचे या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी झाले होते निलंबन
नाशिक मधील मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून, पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोंढे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच वर्षांपूर्वी अटकही केली होती. खातेनिहाय चौकशीनंतर त्याचे निलंबन केले होते. निलंबनाचा काळ संपल्यानंतर तो जनरल ड्युटी करत होता. त्यानंतर बरोबर पाच वर्षांनी त्याला आता दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Deola | सभासदांच्या आग्रहास्तव व्यापारी सुनील देवरे ‘नामको’ची निवडणुक लढवणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here