आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये राज्यभरात आषाढी एकादशी आणि बकरी ईद साजरी करण्यात आली. एकाच दिवशी हे विविध धर्मीय सण आल्याने राज्यात संमिश्र वातावरण बघायला मिळत होतं. मात्र छत्रपती संभाजी नगर मध्ये हिंदू मुस्लिम भाई भाई ही घोषणा सत्यात उतरली आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये देखील बकरी ईद आणि आषाढी एकादशीचा उत्साह गेल्या अनेक दिवसांपासून बघायला मिळत होता. यामध्ये मुस्लिम धर्मियांकडून बकरी ईद ची जोरदार तयारी केली जात होती तर हिंदू धर्मीय बांधवांकडून आषाढी एकादशीची लगबग सुरू झाल्याचं बघायला मिळत होतं. मात्र यातच हिंदू मुस्लिम एकोपा दाखवणारी वारी आज छत्रपती संभाजी नगर मध्ये बघायला मिळाली.
छत्रपती संभाजी नगर मध्ये काही मुस्लिम बांधवांनी टाळ मृदुंग वाजवत बकरी ईद सोबतच आषाढी एकादशी देखील साजरी केली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल चालावा विठ्ठल या जयघोषात संभाजीनगर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड काजी येथे मुस्लिम बांधवांनी विठुरायाच्या वारीत सामील होत टाळ मृदंग वाजवले, हे मुस्लिम वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. इतकच नाही तर या वारकऱ्यांवर मज्जिद मधून पुष्पवृष्टी करत मज्जिद परिसरातून जाणाऱ्या दिंडीच मोठ्या उत्साहात स्वागत देखील केलं आहे.
दरम्यान यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी देखील ज्ञानबा माऊली तुकाराम असा जयघोष करत या दिंडीमध्ये सहभागी होऊन त्यांनी देखील आनंद लुटण्याचा बघायला मिळालं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम