द पॉईंट नाऊ ब्युरो : एका नवऱ्याने आपल्या बायकोने नोकरी करू नये, यासाठी आपल्या बायकोचा हातच मित्रांच्या मदतीने कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि यामागील कारण अतिशय संतापजनक आहे.
पश्चिम बंगालच्या केतूग्राम येथे सरीफुल शेख उर्फ शेख मोहम्मद याची बायको सरकारी रुग्णालयात नर्सची नोकरी करत होती. त्याचा तिच्या नोकरीस विरोध होता. याच कारणातून शेख मोहम्मद याने आपल्या मित्रांच्या मदतीने बायको रेणू खातून झोपेत असतांना, चाकूने वार करत रेणूचा हातच खांद्यापासून वेगळा केला.
आजच्या काळात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षणात तर मुली मुलांहून पुढे गेल्या आहेत. यामुळे मुलींची वाटचाल स्वावलंबी होण्याच्या दिशेने सुरू आहे. आज बहुतांश महिलावर्ग घराला आर्थिक हातभार लागावा, या कारणाने नोकरी करत आहेत. मात्र अजूनही काही विकृत विचारसरणीच्या लोकांना हे सहन होत नाही. आणि याच कारणातून पश्चिम बंगालच्या केतूग्राममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. शेख मोहम्मद याने तर क्रूरतेच्या सर्व परिसीमा ओलांडत फक्त नोकरीला विरोध म्हणून थेट बायकोचा हातच कापला. यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकारची विचारसरणी बदलणे आज आवश्यक आहे.
दरम्यान, याप्रकरणी रेणूच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
नकदी चाहिए? इस रोबोट को लॉन्च करें और देखें कि यह क्या कर सकता है । https://dix.bode-roesch.de/dix