ऐन लग्नाच्या समारंभात मुलगी प्रियकरा सोबत फरार!!!

0
34

The point now – Swati kadam

ही धक्कादायक घटना आहे उत्तर प्रदेशातील बांदा येथील बांदा येथे राहणारी ही मुलगी लग्नाआधी प्रियकर सोबत फरार झाली तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरवल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतला.

हा प्रकार लग्नाच्या दिवशी घडला तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की घरात जोरदार लग्नाची तयारी सुरू होती त्याआधी 20 नोव्हेंबर रोजी मुलीचे बाबा पाहुण्यांसह मुलाच्या घरी टिळा लावण्याचा कार्यक्रमाला गेले होते.आणि त्या क्षणी मुलीने प्रियकरा सोबत पळायचे ठरवले मुलीचे बाबा म्हणजे वडील पाहुण्यांसह घरी आल्यानंतर हे प्रकरण ऐकून त्यांना धक्का बसला.

यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांकडून सर्वत्र शोधले पण तिचा पत्ता लागला नाही पूर्ण शोधल्यानंतरही मुलगी सापडली नाही त्यानंतर उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप भागात असणाऱ्या तिच्या प्रियकराच्या विषयी तक्रार दाखल केली.पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि दोघांचा तपास घेण्यास सुरुवात केली.

तिच्या घरच्याने सांगितले जेव्हा ते तिला लावण्याचा कार्यक्रमातून घरी परतले तेव्हा मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना सांगितले की मुलगी बाजारात गेली होती परंतु ती बाजारातून परतलीच नाही त्यानंतर सर्वांनी शोध घेतल्यानंतर कळाले की मुलगी तिच्या प्रियकरा सोबत पळून गेलेली आहे या सर्व प्रकरणाची चौकशी पोलीस सध्या करत आहेत. याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्या मुलासोबत मुलगी फरार झाली त्याविरुद्ध तक्रार सुद्धा नोंदवून घेतली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here