मालेगाव : राज्यात कांद्याच्या भावाचे काय झाले, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कांदा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस संकटाचा सामना करत असताना व्यापाऱ्यांकडून मात्र कांदा दराबाबत थट्टा केली जात आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये मागणी नसल्याने लिलावही झाले नाहीत. शेतकरी कांदे घेऊन बाजारात दाखल होत असत पण व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. मनमाडमध्येही असाच प्रकार घडला. गोल्टी कांद्याकडे नाक मुरडत व्यापाऱ्यांनी या कांद्याला कवडी मोल भाव दिला होता. शिवाय, उपकार केल्यासारखे खरेदी केली होती. मात्र, शेतकऱ्यांची एकजूट काय करु शकते हे या घटनेवरुन समोर आले आहे. कांद्याच्या दराबाबत असमाधानी असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांद्याला बाजारपेठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा पण गोल्टीच कांदा थेट व्हिएतनामला निर्यात केला. शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलताच त्यांना सर्वांनी हिणवले. . मात्र, शेतकऱ्यांचे धाडस आणि हा अनोखा प्रयोग फळाला आला आहे. जिथे गोलटी कांदा फुकट द्यायची वेळ होती, तिथे आता 20 किलोचा दर कोणत्याही मध्यस्थीशिवाय मिळाला आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठ ताब्यात घेतल्यावर काय होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
शेतकऱ्यांनाच मिळाली व्यापाराची संधी
गोल्टी कांद्याला 50 रुपये क्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना घामाचे तर मोल मिळाले नाहीच उलट पदरमोड करून कांदा विकावा लागते. मात्र, अनेक व्यापाऱ्यांनी गोलटी कांद्याकडे पाठ फिरवली आहे. मनमाड येथील फजल कच्छी हा तरुण व्यापारी आणि त्याचा सहकारी नदीम शेख यांनी शेतकऱ्यांकडून कांदा गोळा करून दोन कंटेनरमध्ये व्हिएतनामला निर्यात केला. त्यामुळे व्हिएतनामसह इतर देशांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला असून आणखी 8 ते 10 कंटेनर पाठवले जातील, असे कच्छी यांनी सांगितले.
गोल्टी कांदा सातासमुद्रापार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम