जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

0
41

द पॉईंट नाऊ: जिल्ह्यात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत सर्व ग्रामस्थ अन् सरपंचांनी आवर्जून सहभागी होऊन आपापली गावे कचरामुक्त करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.
स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ‘सरपंच संवाद’ उपक्रम झाला. यावेळी जिल्हाभरातील सर्व सरपंच व ग्रामसेवकांना ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. स्वच्छता अभियानांतर्गत विविध घटकांविषयी मार्गदर्शन करताना स्वच्छ आणि सुंदर गाव तयार करण्यासाठी सरपंच तसेच लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णुपंत गर्जे, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे आदी उपस्थित होते.

पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली. महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी पोषण माह व स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. यावेळी सेवा पंधरवडा, लम्पी ह्या त्वचा रोगा विषयीही मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. हर्षल नेहते यांनी माता सुरक्षित घर सुरक्षित अभियानाबाबत तर डॉ. देशमुख यांनी क्षयरोग मोहिमेची माहिती दिली.

याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता ही सेवा उपक्रामांतर्गत जिल्ह्यात शालेय स्तवरावर कचरा कुंड्या तयार करणे व रंगविणे, पथनाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सार्वजनिक शौचालय भिंती रंगविणे स्पर्धा, घरगुती स्तरावर कचरा विलगीकरण स्पर्धा, कंपोस्ट खत निर्मिती स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोडे यांनी मार्गदर्शनाचे मुद्दे ही सांगितले.

प्रत्येक गावाने कचरामुक्त गाव करण्यासाठी नियोजन करावे.

प्रत्येक घरातून चार प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा संकल्प करावा.

गावातील नदी, नाले तसेच महत्त्वाच्या जागांची स्वच्छता करावी.

उकिरडेमुक्त गाव करण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन जाईन.

दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभेत हागणदारीमुक्त अधिक गाव, हर घर जल गावाचे निकष पूर्ण करणाऱ्या गावांचा ठराव करावा.

जलजीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा ग्रामसभेसमोर ठेवून गावात दर्शनी भागात त्याचे प्रसारण करावे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here