ठाणे पोलिस, धार्मिक स्थळापासून २०० मी अंतरावर लाऊड स्पिकर वापरण्यास बंदी

0
7

महाराष्ट्र भोंग्यांवरून राजकारण तापलेले असतानाचा धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, ध्वनिक्षेपक विक्रेते, ध्वनी साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती घेऊन जवळील पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

राज्यभरात धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवरून मोठे वादंग सुरु आहे. कोणत्याही धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणूका आणि सभा घेण्यास २७ जूनपर्यंत ठाणे पोलिसांतर्फे बंदी घालण्यात आली आहे. नाशिक बरोबरच मुंबईतील ठाण्यात देखील पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला  त्यामुळे कोणत्याही तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही.

परवाना न घेता ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणूका तसेच सभा घेणे यांसारख्या गोष्टी करण्यास २७ जूनपर्यंत विरोध करण्यात आला आहे. काही नेतेमंडळींकडून धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांना विरोध दर्शविल्याने अनेक ठिकाणी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच ध्वनीक्षेपणाच्या वापरामुळे ध्वनीप्रदुषणात वाढ होत.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदार,  ज्या ग्राहकाने ध्वनिक्षेपक किंवा त्या संबंधीचे साहित्य खरेदी केलेल्या व्यक्तीची माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. असे निर्देश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी दिले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here