ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा; गिसाका शेअर्स प्रकरणी केली चौकशीची मागणी

0
32
Malegaon
Malegaon

मालेगाव : दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर (गिसाका) कारखाना अवसायानात असतांना तो वाचविण्यासाठी गिरणा बचाव समितीच्या नावाखाली Girna-Mosam Shugar Agro and Alide Industries स्थापन करून पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांकडून प्रत्येकी हजार रूपये जमा करत कोट्यवधीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दहा दिवसात सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा अन्यथा फसगत झालेल्या शेतकर्‍यांसह पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा उध्दव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांतर्फे देण्यात आलेला आहे.

अप्पर जिल्हाधिकार्‍यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामा मिस्तरी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी निवेदन देत शेतकर्‍यांकडून कोट्यवधी रूपये जमा करत त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पालकमंत्री भुसे यांच्या चौकशीची मागणी करण्यात आले आहे. अवसायानात असलेला गिरणा सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी गिरणा बचाव समितीच्या नावाखाली गिरणा-मोसम शुगर अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. ही कंपनी स्थापन करत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रत्येकी हजार रूपये जमा केले होते.

नाशिकरोडला दारणा धरणातून थेट जलवाहिनी; महासभेत 250 कोटींच्या प्रस्तावाला हिरवा कंदील 

कोट्यवधी रूपये जमा झाले असतांना फक्त कंपनीचे 47 मुख्य Shareholder दाखवून त्यांच्याकडून 16 कोटी 21 लाख 8 हजार 800 रूपयांचे भागभांडवल गोळा केले दाखवले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी गिरणा कारखाना तर वाचवला नाहीच पण शेतकरी आणि मुख्य भागधारकांची कोट्यवधी रूपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here