नाशिक: राज्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारा टीईटी घोटाळ्यात उत्तर महाराष्ट्र देखील मागे नाही. परीक्षेचे (TET Exam) पेपर फुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून यात उत्तर महाराष्ट्रात सुमारे 179 बोगस शिक्षक उघडकीस आले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्र किती बरबटले आहे हे उघडकीस आले.
नुकतेच राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या बोगस शिक्षकांची यादीत उत्तर महाराष्ट्राच्या ४ जिल्ह्यात तब्बल १७९ बोगस शिक्षक नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तब्बल १७९ बोगस शिक्षक असल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकच्या धुळे आणि जळगावत सर्वाधिक शिक्षक अनेक नामंकित शिक्षणसंस्थामध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणात (TET exam paper leak case) पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने (Pune Police cyber cell) कारवाई करण्यात आली. राज्य शासनाकडूनही मोठी कारवाई झाली, या प्रकरणातील मुख्य आरोपी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांचे निलंबन करून त्यांना अटक केली, यानंतर अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून निःपक्ष तपास केला गेला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा (Teachers Eligibility Test scam case) झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं.
या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची देखील कारवाई झाली आहे. (Enforcement Directorate) ईडीने मनी लाँड्रिंग (money laundering case) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून छापेमारित धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम