TET घोटाळ्याचा अजून एक बॉम्ब फुटला ; घोटाळ्यात आता थेट IAS अधिकारी सापडला

0
39

द पॉईंट नाऊ ब्युरो : TET घोटाळा प्रकरणी मोठी बातमी हाती येते आहे. या घोटाळा प्रकरणात पुणे येथे एका IAS अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुशील खोडवेकर असे या IAS अधिकाऱ्याचे नाव आहे.

या TET घोटाळा प्रकरणात साडेसात हजाराहून अधिक अपात्र उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती करण्यात आल्याचा आरोप आहे.

या TET घोटाळ्यात मोठे धागे – दोरे हाती लागत आहेत. अक्षरशः शिक्षण परिषदेच्या आयुक्तांपासून मोठमोठ्या लोकांचा यात हात असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक उमेदवाराकडून यासाठी एक ते अडीच लाख रुपये घेण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पुणे येथे आता एका IAS अधिकाऱ्यालाच अटक करण्यात आल्याने, अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here