Tejas Teaser : कंगना रणौतच्या बहुचर्चित ‘तेजस’चा टीझर प्रदर्शित

0
36

Tejas Teaser  : ‘तेजस’ या चित्रपटाच्या टीझरसह कंगनाने या चित्रपटाचं नवीन पोस्टर आणि ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केलेली आहे. ‘एयर फोर्स डे’च्या मुहूर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.कंगना रणौत ही बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.जी सतत तीच्या काही ना काही वक्तव्यांनी चर्चेत असते. चित्रपट असो किंवा राजकीय मत कंगना अगदी स्पष्टपणे सगळीकडे व्यक्त होत असते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. नुकताच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तिचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा टीझर शेयर केला आहे.

Mangalyaan-2 | ‘चांद्रयान 3’च्या यशानंतर इस्रोची नवी योजना

बॉलिवुड अभिनेत्री कंगनाचा हा चित्रपट भारतीय हवाई दलाची पायलट ‘तेजस गिल’ यांच्या जीवनावर आधारलेला आहे. खरंतर या चित्रपटाची चर्चा दोन वर्षांपासून सुरू होती.२०२२ मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणं अपेक्षित होतं परंतु काही कारणास्तव हा चित्रपट लांबणीवर पडत होता.प्रथम हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर अचानक याच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेतले गेले आहेत. चित्रपटाचं व्हीएफएक्सचं बरंच काम बाकी असल्याने हे प्रदर्शन लांबणीवर ढकललं गेलं.परंतु अखेर या चित्रपटाचा पहिला टीझर लोकांसमोर आला आहे.

या चित्रपटात बॉलिवुड अभिनेत्री कंगना हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये ‘तेजस गिल’ यांच्या भूमिकेत एका जबरदस्त अंदाजात बघायला मिळत आहे. याबरोबरच अंगावर रोमांच आणणारा एक संवादही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. टीझरमधून फक्त कंगनाचा डॅशिंग अवतारच आपल्याला पाहायला मिळाला आहे.बाकी टिझरमध्ये चित्रपटाच्या कथेबद्दल काहीच कल्पना देण्यात आलेली नाही.

IND vs NED | इंडिया आणि नेदरलँड्स 12 वर्षांनी खेळणार आमनेसामने

या चित्रपटाच्या टीझरसह कंगनाने याचं नवीन पोस्टर आणि ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘एयर फोर्स डे’च्या मुहूर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर ‘तेजस’ २७ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच कंगनाची मुख्य भूमिक असलेला व तिने स्वतः दिग्दर्शित केलेल्या ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. नुकताच कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्या चित्रपटाला ठीक ठाक प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलेला पहायला मिळाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here