४ सुवर्णसह भारताने केला कॉमनवेल्थ गेम्सचा शेवट संस्मरणीय, स्पर्धेत भारत चौथ्या स्थानी

0
13

मुंबई – बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या अखेरच्या दिवशी भारताने तब्बल ४ सुवर्णपदकासह १-१ रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई करत स्पर्धेचा संस्मरणीय शेवट केला. स्पर्धेत भारताने २२ सुवर्णपदकसह तब्बल ६१ पदकांची कमाई करत पदक तालिकेत चौथे स्थान मिळवले आहे.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाची सुरूवात पी. व्ही. सिंधुपासून झाली. बॅडमिंटन महिला एकेरीत तिने कॅनडाच्या मिचेल लीचा सहज पराभव करत सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी – सात्विक रंकीरेड्डी जोडीने भारताला सुवर्णपदक तर पुरुष एकेरीत के. श्रीकांतने कांस्यपदक पटकावले.

तिकडे भारताच्या अचंता शरथ कमलने टेबलटेनिस पुरुष एकेरीत इंग्लंडच्या खेळाडूचा पराभव करत पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यंदाच्या स्पर्धेत त्याने ३ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळवत देशातर्फे सर्वाधिक मेडल जिंकण्याचा मान पटकावला आहे. मात्र, भारतीय पुरुष संघाकडून हॉकी फायनलमध्ये निराशा झाली. ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० ने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. तर भारताला रौप्य आणि यजमान इंग्लंडला कांस्यपदक प्राप्त केले.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेत बोलबाला कायम

संपूर्ण स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदक मिळून तब्बल ६१ पदके मिळवली आहे. यासह भारतीय पथक स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला. ६७ सुवर्णसह सर्वाधिक १७८ पदके ऑस्ट्रेलियाने मिळवली तर यजमान इंग्लंड ५७ सुवर्ण पदकासह १७६ पदके पटकावत दुसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२:३० वाजता स्पर्धेचा समारोप सोहळा पार पडणार. समारोपात अचंता कमल आणि बॉक्सर निखत झरीन ध्वजवाहक असणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here