शिक्षकांनी शनिवार-रविवारीही शाळा सुरू ठेवाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
51

द पॉईंट नाऊ ब्युरो : शनिवारी आणि रविवारी देखील शाळा सुरू ठेवाव्यात असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शिक्षकांनी शनिवार आणि रविवार देखील शाळा सुरू ठेवायला हव्यात असे अजित पवार म्हणाले.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. मात्र शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला. यामुळे पालक वर्गाने देखील नुकतेच शाळा पुन्हा बंद करण्याला विरोध केला होता आणि पुन्हा शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आणि मुलांचे शिक्षण पुन्हा ऑफलाइन सुरू झाले.

मागील दोन वर्षात शाळा बंद असल्याने शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलतांना हे वक्तव्य केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here