खुशखबर ! , टाटा मोटर्स देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आज करतेय लॉन्च

0
30

काही काळापासून जगासह भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक कारचे नवे मॉडेल लॉन्च करण्यासाठी ऑटोमेकर्समध्ये स्पर्धा लागली आहे. टाटा मोटर्सची भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये मजबूत पकड आहे. सध्या कंपनी देशात तीन इलेक्ट्रिक कार विकते. आता टाटा मोटर्स आपली पुढील इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही आज 28 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. जाणून घ्या काय असेल या कारची खासियत.

रेंज काय असेल
Tiago EV मध्ये 26kWh चा बॅटरी पॅक दिसू शकतो. तसेच, यात 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देणे अपेक्षित आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज पाहता येईल. या कारची बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 1 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते.

वैशिष्ट्ये

टाटा टियागो EV वर मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्शन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये पाहता येतील.

किंमत किती असेल?

Tata Tiago EV ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. सध्या, भारतातील सर्वात कमी किमतीची इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. टाटा टियागो इलेक्ट्रिकची किंमत 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

कोण भिडणार?

Tata Tiago EV ही सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार असल्याने ती भारतीय बाजारपेठेत Tata Tigor EV शी स्पर्धा करू शकते. पण सध्याच्या घडीला ही हॅचबॅक सेगमेंटमधील देशातील एकमेव इलेक्ट्रिक कार असेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here