द पॉईंट नाऊ ब्युरो : ‘कोई मिल गया’ चित्रपटाचे नाव जरी काढले, तरी समोर उभा राहतो तो ‘जादू’. अर्थात या चित्रपटात असणारा परग्रहवासी किंवा त्याला दैनंदिन भाषेत एलियन असं म्हणतात. तर हेच एलियन कोल्हापुरात चक्कर मारून गेले, अशी चर्चा आहे. आणि यामुळे कोल्हापूरकर काहीसे घाबरलेले असल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर शहरात आकाशात काही वेगळ्याच हालचाली नुकत्याच पाहायला मिळाल्या. पन्हाळा गडाच्या परिसरात अवकाशात एक पांढरीशुभ्र अशी तबकडी पाहिल्याचं अनेक रहिवाशांनी सांगितल्याचं बोललं जात आहे. आणि ते अगदी एलियनच्या यानासारखं अर्थात, तबकडी सारखं दिसल्याचं देखील बोललं जात आहे.
आत्तापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी एलियनच्या तबकड्या किंवा एलियन सारखं काही दिसल्याच्या अनेक घटनांच्या वाच्यता झाल्या. याबाबत अनेक वेळा तपास देखील करण्यात आले. मात्र म्हणावे तसे काहीच हाती लागले नाही. पृथ्वीव्यतिरिक्त या ब्रह्मांडात इतर कुठे जीवन आहे का? किंवा आपल्या व्यतिरिक्त अजून कुठल्या ग्रहावर कुठली जीवसृष्टी आहे का? याचा शास्त्रज्ञांनी बऱ्याच वर्षांपासून शोध घेत आहेत. मात्र अद्याप काही ठोस हाती लागलेले नाही.
आता महाराष्ट्रात कोल्हापुरात दिसलेल्या या तबकडी सारख्या गोष्टीने अजून कुतूहल किंवा उत्सुकता वाढवली आहे. अर्थात, हे जे काही तबकडी सारखं आकाशात दिसलं ते नेमकं काय? याचा अजून निश्चित काही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. यामुळे याचा तपास व्हावा अशी मागणी केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम