तळेगाव रोही बस लवकर सुरु करा

0
36

चांदवड : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका मौजे तळेगाव रोही येथील शिष्टमंडळ श्री.कुवर साहेब
विभागीय अधिकारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक यांना भेटून मनमाड-तळेगावरोही – लासळगाव चांदवड -तळेगाव रोही- येवला बस सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

येथील मूळ रहिवासी ५५००-६००० लोकसंख्या असुन हया गावातून सामान्य जनतेला तालुक्याला आणि व्यवसाय करणाऱ्या मजुरांना आणि महाविद्यालयास जाणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी लासलगाव, मनमाड, चांदवड तसेच येवला जाण्या-येण्या करिता दळण-वळण व्यवस्था साधन उपल्धत नसल्याने, महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीत कमी २५० वर आहे. त्याकरिता मनमाड ते लासलगाव तळेगाव रोही मार्गे तसेच चांदवड ते येवला तळेगाव रोही मार्गे अशा पध्दतीने आपल्या एस.टी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.

मनमाड- तळेगाव रोही-लासलगाव ह्या बससेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावे असे निवेदन सादर करताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास केदारे, किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस सुखदेव बाबा केदारे, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अन्वर पठाण, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रा. मगन केदारे, रविंद्र गंगाधर केदारे आणि संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक मंडळाने ही पत्र दिले आहे.

अंबादास केदारे यांनी विभागीय अधिकारी यांना विनंती केली आहे की, आम्हाला अपेक्षा आहे आपण आमच्या तळेगाव रोही परिसरातील शेतकरी -, सामान्य कुटुंबातील जनतेची, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन देणार नाही. आणि लवकरात लवकर बस सुरू करण्यात आपली मदत मिळेल असे निवेदनाद्वारे अंबादास केदारे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नाशिक ग्रामीण, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष अन्वर पठाण, किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस सुखदेव बाबा केदारे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रा. मगन केदारे, रविंद्र गंगाधर केदारे यांनी बस सुरू करण्याबाबत मागणी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here