टाकेद येथे राष्ट्रीय कृत बँक ए टी एम सुविधा उपलब्ध करावी : राम शिंदे यांची मागणी

0
39

सर्वतीर्थ टाकेद : टाकेद येथे रविवार ता.२७ दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाप्रसंगी टाकेद परिसराच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे आदिवासी बांधवांच्या विविध विकास कामांच्या व्यथा मांडत राष्ट्रीय कृत बँक आणि ए टी एम सुविधेची मागणी केली.यासोबतच रामायणा सर्किट तीर्थ स्थळ पर्यटन विकास निधीतून टाकेद सर्वतीर्थ तिर्थ विकाससाठीं मंजूर असलेला चार कोटी निधी मंजूर असतांना देखील अद्यापही कोणतीही कामे चालू झाली नाही तरी सदर कामे चालू करण्यात यावी जे ने करून या ठिकाणचा विकास होईल अशी अपेक्षा देखील खासदार गोडसे यांच्याकडे राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान इगतपुरीच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात जवळपास वीस-पंचवीस ग्रामपंचायत व चाळीस वाड्या वस्त्या असून या परिसरातील लोकसंख्या अंदाजे अंदाजे पन्नास हजारांच्या आसपास आहे. या परिसरातील एकमेव मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणून ग्रामपंचायत टाकेद बु ही एकमेव महसुली प्रमुख बाजारपेठ आहे. टाकेद याठिकाणी दररोज हजारो शालेय विद्यार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचारी नोकरदार वर्ग, शिक्षक कर्मचारी, कामगार वर्ग, शेतकरी, पर्यटक, भाविक भक्तगण,व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दररोज ये-जा करतात, परंतु टाकेद परिसरात कुठेच राष्ट्रीय कृत बँक,ए टी एम सुविधा नसल्याने अनेक ग्रामस्थ नागरिकांची बँक सुविधेवाचून मोठी गैरसोय होत आहे. या परिसरतील बहुसंख्य शेतकरी ग्रामस्थ नागरिक नोकरदार कर्मचारी पर्यायाने घोटी ,धामणगाव साकुर फाटा SMBT व तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या बँकेत अवाजवी वेळ व पैसे खर्च करून ये-जा करतात.

यासोबतच टाकेद या मध्यवर्ती ठिकाणी असलेली जिल्हा सहकारी बँक शाखा देखील बंद झाल्याने या परिसरात बँक सुविधा नसल्याने शेतकरी बांधवांसह सर्वांचीच मोठी बँक सुविधेवाचून गैरसोय होत आहे. तरी आपण ही परिस्थिती लक्ष्यात घेऊन आपण प्रयत्न करून या परिसरातील एकमेव असलेल्या ग्रामपंचायत टाकेद बु या ठिकाणी एक राष्ट्रीयकृत बँक ए टी एम सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी जे ने करून या परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी नागरिकांना ग्रामीण भागात स्थानिक ठिकाणी राष्ट्रिय कृत बँक सुविधा उपलब्ध होईल असे खासदार हेमंत गोडसे यांना दिलेल्या टाकेद ग्रामपंचायत मागणी पत्रात म्हंटले आहे. दरम्यान टाकेद याठिकाणी राष्ट्रीयीकृत बँक व ए टी एम सुविधा व्हावी या मागणीचे पत्र खासदार हेमंत गोडसे यांना देतांना टाकेद गावच्या सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, जेष्ठ नागरिक आबाजी बारे आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.दरम्यान नक्कीच या भागात राष्ट्रीयकृत बँक ए टी एम सुविधा आणण्यासाठी माझा कटाक्षाने प्रयत्न राहील असे खासदार गोडसे यांनी यावेळी सर्वांना अश्वासित केले.

“इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद ही एकमेव मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी परिसरातून अनेक गावांतून व्यवसायिक,शेतकरी ग्रामस्थ नागरिक शालेय विद्यार्थी कर्मचारी पर्यटक रोज ये-जा करत असतात परंतु याठिकाणी मुख्य बाजारपेठ दळणवळण असताना देखील राष्ट्रीय कृत बँक एटीएम सुविधा नसल्याने सर्वांची गैरसोय होते.परिणामी या भागातील शेतकरी बांधवांसह,शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांना घोटी,इगतपुरी धामणगाव याठिकाणी वेळ पैसा खर्च करत बँक कामकाजासाठी जावे लागते.जर टाकेद याठिकाणी राष्ट्रीय कृत बँक सुविधा झाली तर अनेकांची गैरसोय दूर होईल”
राम शिंदे सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here