देवळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 310 अर्ज दाखल

0
31
देवळा तहसील कार्यालयात मंगळवारी अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी केलेली गर्दी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; (सोमनाथ जगताप )देवळा तालुक्यातील माहे जानेवारी २०२१ ते डिसेबर -२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकिसाठी ४६ प्रभागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण ३१० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

देवळा तहसील कार्यालयात मंगळवारी अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी केलेली गर्दी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे – कंसात दाखल अर्ज विजयनगर (११), पिंपळगाव(३४), खुंटेवाडी,(२६) वाखारी(२२), शेरी,(१४) रामेश्वर,(१५) सुभाषनगर(१२), सावकी(३६), खर्डे(४९), वार्षी(१७), खडकतळे,(१८) गुंजाळनगर(३३), कापशी(२३) याप्रमाणे ,दरम्यान , आज अंतिम दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आला होता . दाखल नामनिर्देशनपत्राची उद्या बुधवार (दिनांक २०) रोजी छाननी करण्यात येणार आहे तर शुक्रवार (दिनांक २२) रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत माघारीची मदूत आहे . मतदान (दिनांक ०४) रोजी होणार आहे . येन पावसाळ्यात निवडणूकची रणधुमाळी पहावयास मिळणार असून, खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here