मुंबई : येत्या १६ ऑक्टोबरपासून आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झालेला आहे.
काल भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. मात्र त्यापूर्वी बीसीसीआयतर्फे एक निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. ज्यात स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ अगदी सुटाबुटात उभे राहत एकत्र फोटोसेशन केले. त्यांचा हा फोटो बीसीसीआयने आपल्या सोशल मिडिया साईट ट्वीटरवर शेअर केला आहे. ज्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या व इतर खेळाडू डावीकडून, तर प्रशिक्षक राहुल द्रविड व इतर सपोर्ट स्टाफ हा उजवीकडे उभा आहे.
Picture perfect 📸
Let's do this #TeamIndia@cricketworldcup, here we come ✈️ pic.twitter.com/XX7cSg3Qno
— BCCI (@BCCI) October 5, 2022
स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील या संघाचा भाग होता. मात्र, पाठीच्या दुखण्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पण त्याच्या जागी कोण ऑस्ट्रेलियाला जाणार, हे मात्र अद्याप जन्जीश्चीत झालेले नाही. त्यामुळे या फोटोत १४ खेळाडू दिसत आहेत. या संघात श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई व दीपक चहर यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम