Swacha bharat abhiyan : गेल्या काही वर्षांपासून केंद्र व महाराष्ट्र सरकारने ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ हे अभियान महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय प्रशासानाकडून घेतला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शासकीय आणि निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास 200 रुपयांचा दंड देखील आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी देखील शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.
या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेश देखील शासनाने दिले असून सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून तसेच शासकीय आणि खासगी वास्तू स्वच्छ ठेवण्यासाठी “स्वच्छ भारत स्वस्थ भारत” ही मोहीम देशभरात राबण्यात येत आहे. तसेच शासकीय आणि खासगी इमारत परिसराची सफाई करुन शासकीय कार्यालये आणि परिसर हा तंबाखूमुक्त परिसर व्हावा यासाठी करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयं, खासगी कार्यालये तसेच शाळा आणि महाविद्यालये आहेत तिथे तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करण्यात बंदी घालण्यात आली आहे. तसेच शासकीय इमारतीच्या ठिकाणी धुम्रपान करण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
तरुणाईला व सामान्य नागरिकांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडून यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान यासंदर्भात राज्य शासनाकडून पार पडलेल्या बैठकीमध्ये कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर दुष्पपरिणाम होतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी हानीकारक ठरु शकते त्यामुळे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम