देवळा : हात उसनवार घेतलेल्या पैशांच्या तगाद्यामुळे देवळा येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेचा देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यातील एका आरोपीलाअटक करण्यात आली असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,फिर्यादी संजय हरी गायकवाड रा विद्यानगर, देवळा यांनी आरोपी प्रवीण सदाशिव आहेर रा तीसगावं ता देवळा व अमोल निकम रा दाभाडी ता मालेगांव यांचे कडून २१ लाख रुपये हात उसणाव घेतले आहेत. त्या पोटी फिर्याद यांनी वरील आरोपींना तीन धनादेश दिले आहेत. हे धनादेश खात्यावर पैसे नसल्याने वटले नाहीत .
यामुळे त्यानी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड(२४) रा विद्या नगर देवळा याला प्रत्येकक्ष भेटून व मोबाईल वर वारंवार धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवारी दि ११ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी घरी कोणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ,पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर या आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली असून, अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महेश शिंदे करीत आहेत. संजय गायकवाड यांना मयत हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हुशार असलेल्या हर्षलच्या निधनाने देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम