Sushma Andhare | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळल्याची माहिती समोर येत आहे. हे हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आले होते. दरम्यान, सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झालेली नसून, सुषमा अंधारे आणि पायलट हे दोघेही सुखरूप आहेत. मात्र, हे हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अजून समोर आलेले नाही. सुषमा अंधारेच्या हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याआधीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आज सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे या महाडहून बारामती येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात जाणार होत्या. (Sushma Andhare)
त्यासाठी महाडहून बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या. यानंतर सुषमा अंधारे यांच्या समोरच त्यांना घेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले असून, हेलिकॉप्टरचा पायलट हा सुखरुप आहे. या घटनेनंतर उपस्थितांच्या मदतीने पायलटला बाहेर काढले. (Sushma Andhare)
Sushma Andhare | त्यांनी बोलताना डोळ्याला झेंडूबाम लावावा; अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | नेमकं काय घडलं..?
दरम्यान, महाड येथे सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर नऊ वाजता आले. तर, या हेलिकॉप्टरमध्ये आधीच काही तांत्रिक अडचण असल्याची प्राथमिक माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर हेलिपॅडवर आल्यानंतरही बराच वेळ ते हवेत होते. यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले.(Sushma Andhare)
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सुखरुप असून त्यांना या अपघातात कुठलीही इजा झालेली नाही. सध्या त्या महाडमध्ये आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या की,”मी सुखरूप असून, माझा कॅप्टन, असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सर्व सुखरूप आहोत. चिंता नसावी”. (Sushma Andhare)
Sushma Andhare | मालेगावात ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या!
सुषमा अंधारे यांची राजकीय कारकीर्द ?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा दगडू अंधारे या एक वकील आहेत. राज्यशास्त्र व समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या व लेखिका देखील आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या 2022 च्या दसरा मेळाव्यानंतर त्या विशेष चर्चेत आल्या. त्यांच्या आक्रमक शैलीतील भाषणासाठी टया ओळखल्या जातात. सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आणि ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक आहेत.(Sushma Andhare)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम