डॉ सुराणा यांची राज्य पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित संचालक पदी निवड

0
37

देवळा ; येथील श्रीमान सुगनमलजी सुराणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा यांची यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित संचालकपदी निवड करण्यात आली .

जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या देवळा येथील सुराणा पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असून, सभासदांना तात्काळ कर्ज पुरवठा तसेच नगण्य थकबाकी याच बरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून या संस्थेने सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे .

राज्य पतसंस्था फेडरेशन ने दखल घेऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित संचालकपदी निवड केली आहे . डॉ सुराणा यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पतसंस्थाच्या पदाधिकाऱ्यांना वसुली व इतर कामी येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्याकामी नक्कीच मदत मिळणार असल्याची माहिती फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली. त्यांच्या निवडीचे फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष नारायण वाजे आदींसह त्यांच्या संचालक मंडळासह सुराणा व तालुक्यातील पतसंस्थेच्या सभासद संचालकांनी
अभिनंदन केले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here