शहिद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाला सुराणा पतसंस्थेची आर्थिक मदत

0
36
महाजनपूर ता.निफाड येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान रंगनाथ पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देतांना सुराणा पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा, व्हा चेअरमन डॉ जगदिश धामणे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; महाजनपूर ता.निफाड जि.नाशिक येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान रंगनाथ वामनराव पवार यांचे बाडमेर ( राजस्थान) येथे कर्तव्य बजावत असतांना दोन दिवसांपूर्वी निधन झाले. या कुटुंबातील सदस्यांना येथील सुराणा पतसंस्थेच्या वतीने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली .

महाजनपूर ता.निफाड येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान रंगनाथ पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देतांना सुराणा पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा, व्हा चेअरमन डॉ जगदिश धामणे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा येथील सुराणा पतसंस्थेच्या वतीने जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे . त्यानुसार महाजनपूर ता.निफाड जि.नाशिक येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान रंगनाथ वामनराव पवार यांचे बाडमेर ( राजस्थान) येथे कर्तव्य बजावत असतांना नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना संस्थेने रु.२५०००/- ची आर्थिक मदत केली आहे .

संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे . यावेळी अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा, व्हा चेअरमन डॉ जगदिश धामणे, संचालक प्रदीप सुराणा,सुभाष सोनवणे, जनार्दन शिवदे आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here