मुंबई: सेनेत सद्या अंतर्गत बंडाळी उफाळली असून, शिवसेनेचे आमदार व राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय उदय सामंत हे देखील आज शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
सामंत पक्ष सोडणार नाही अशी खात्री अनेकांना होती मात्र सकाळपासून नॉट रिचेबल असलेले सामंत दुपारनंतर गुवाहटीला रवाना झाल्याची बातमी समोर आली. सामंंत यांच्यासह शिंदे गटातील अपक्षांसह आमदारांची संख्या आता ४६ वर गेली आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत हे देखील गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत , असे झाल्यास सेनेला हा मोठा धक्का असेल तसेच संजय राऊत यांना देखील हा मोठा फटका असेल हे ही नक्की आहे.
सेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर प्रमानापेक्षा टीका करत असून सर्व बंडखोरांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद असल्याचा दावा करत आहेत. आज बोलतांना म्हणाले की एका बापाचे असाल तर निवडणुकीला सामोरे जा असे म्हणले, मात्र आता त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हेच शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी डोके वर काढले आहे. म्हणून राऊत यांचे भाऊ फुटल्यावर राऊत काय बोलणार याकडे देखील लक्ष आहे.
संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले असून सुनिल राऊत हे मुंबईमध्येच असल्याचे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले, सुनिल राऊत हे सध्या मुंबईतच असून त्यांची कांजूरमार्ग येथे सभा झाली. मी माझे कुटूंब मेले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. म्हणून आता नक्की काय होणार हे बघण महत्वाचे आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने सुनिल राऊत नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे राऊत शिंदे गटात सहभागी झाल्यास नवल वाटायला नको.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम