बिग बॉस या शोमध्ये ती सर्वात तरुण स्पर्धक म्हणून समोर आली होती. बिग बॉसमध्ये असताना शालिन भनौत आणि टीना दत्तासोबतचा तिचा वाद चांगलाच रंगला होता.
नंतर तिने शिव-साजिदच्या मंडलीमध्ये सहभागी होत आपल्या खेळाला नवी सुरुवात केली होती.
बिग बॉमधून बाहेर येताच सुम्बुल तौकीरने मुंबईत आपलं नवं घर खरेदी केलं आहे. अभिनेत्रीने नुकतंच नव्या घराच्या आतील फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
नव्या घरामध्ये सुम्बुल तौकीरने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये फक्त सुम्बुलचे काही खास मित्र उपस्थित होते. या पार्टीमध्ये शिव ठाकरे, निमरित अहलुवालियापासून ते प्रणाली राठोड, मयुरी देशमुखपर्यंत अनेक कलाकार उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम