Sucide News | राज्यात सध्या आत्महत्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून, यात प्रामुख्याने निराशेने ग्रस्त असलेल्या तरुणांचा समावेश आहे. यामागे प्रेमसंबंध हे प्रमुख कारण अधोरेखित झाले आहे. दरम्यान, अशीच एक प्रेमसंबंधातून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. (Sucide News)
दरम्यान, मुंबईत अंधेरी भागात साकिनाका येथे एका तरूणाने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ह्या मयत तरुणाचे नाव हे प्रथम होवाळ असे असून, हा २० वर्षांचा होता. गेल्या नोव्हेंबर महिन्यात प्रथम याने आयुष्य संपवले होते. पण या आत्महत्येमागचं कारण समोर आलं नव्हतं. दरम्यान, आता महिन्याभरानंतर ह्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून, प्रथमच्या आत्महत्येमागे एका मुलीचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या संबंधी एक पुरावा देखील हाती लागला आहे.
Breaking | चांदवडला स्फोटकांनी भरलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात
साकीनाका परिसरातील व्यापारी असलेल्या सचिन होवाळ यांचा मुलगा प्रथम होवाळ याने गेल्या महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. पण, आता ह्या आत्महत्येमागचं कारण समोर आले आहे. पोटच्या मुलाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने वडीलांना मोठा हक्क बसला होता. यामुळे ते मोठे चिंतेत होते. दरम्यान, आता मृत प्रथम याच्या मित्रानेच या प्रकरणात मोठा ट्विस्ट आणला आहे.(Sucide News)
या प्रकरणी, मित्राने सांगितले की प्रथम याचे सन २०२२ जुलै महिन्यापासूनच संबंधित मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात असताना ह्या मुलीने आधी त्याच्याकडून खरेदिसाठी तब्बल एक लाख रूपये मागितले होते. आणि हे पैसे न दिल्यास नाते तोडण्याची धमकीही तिने दिलेली होती. दरम्यान, ही मुलगी इथेच थांबली नाही तर, तिने प्रथमच्या विरोधात पोलीस ठाण्यात एक गुन्हाही दाखल केला होता. तसेच पैसे न दिल्यास दुसरा गुन्हाही दाखल करेल अशी धमकीही दिली होती.(Sucide News)
Mumbai Crime | ‘ती’ घरात एकटी असल्याचा डाव साधत बापानेच मुलीला…
तुला भेटूनच माझी चुक झाली|(Sucide News)
तसेच प्रथमच्या मित्राने त्याच्या जुन्या फोनमधील काही ऑडिओ क्लिप्स तसेच चँट्स त्याच्या वडिलांना दाखवले. ज्यामध्ये संबंधित मुलीने प्रथम याचा छळ केल्याचे दिसत आहे. तिच्या छळाला कंटाळून प्रथमने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वीच प्रथमने ११ ऑक्टोबर २०२३ रोजी त्या मुलीला मेसेजदेखील केला होता. दरम्यान, प्रथमने केलेल्या मेसेजमध्ये तो तिला म्हणत आहे की, ‘तुला भेटूनच माझी चुक झाली. मला मरायचे नाहीये. प्लीज मला मारू नकोस’ अशा आशयाचा मेसेज त्याने तिला केला होता. तसेच या मेसेजनंतर साधरण ३१ ऑक्टोबरपर्यंत संबंधी तरूणी त्याच्या संपर्कात होती. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी त्याने आत्महत्या केली होती. (Sucide News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम