स्वप्निल अहिरे,
प्रतिनिधी आराई : ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग ’ हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून धर्माचरणाच्या पद्धतीही निरनिराळ्या आहेत. पद्धती भिन्न असल्या तरी त्यांच्यामुळे साध्य होणारा परिणाम सारखाच असतो, म्हणजे त्या पद्धतींमुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ हा मिळतोच. आपापल्या प्रकृतीप्रमाणे ज्याला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, त्याने ती अवलंबणे उपयुक्त ठरते. तसेच काहीसे म्हणावे लागेल.
आज तरूण आपला वाढदिवस आपल्या मित्रांसोबत मोठ्या उत्सवात साजरा करतात पण जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस कोणीच साजरा करताना दिसत नाही, या भावनेतून आराई येथील सामाजिक कार्यकर्ते अश्विन पाटील उर्फ गंपू नाना यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच तरुणांसाठी प्रेरणादायी व त्यांच्या जीवनात उत्सव वाढणारा असा भव्य दिव्य कार्यक्रम गावातील तरुणांना एकत्रीत करून अनोख्या पद्धतीने १२५ नागरिकांचा वाढदिवस साजरा करत ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदात पाडली.
१ जून म्हटला की ज्यांना आपला जन्मदिवस आठवणार नाही त्यांच्यासाठी पर्वणीच म्हणावी लागेल. कारण पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धती कमी प्रमाणात विकसित झाल्याने आपल्या मुलांच्या जन्मतारखा पालकांच्या लक्षात राहत नसत. त्यांना फक्त कुठलातरी एखादा सण वार किंवा एखाद्या देवाची किंवा नेत्याची तिथी आठवणार मग त्यावर ते लक्षात ठेवायच. आणि मुलाला शाळेत घालायचं तर गुरुजी विचारणार जन्मतारीख तर सांगणार ठेवा तुमच्या सोयीनं. मग काय गुरुजींनी ठेवायची १ जून, ७ जून किंवा १० जून.
सर्वसाधारण१ जुन ही जन्म तारीख बऱ्याच लोकांची असल्याने त्या दिवसाचे औचित्य साधत आराई येथील सामाजिक कार्यकर्ते अश्विन आहिरे ह्यानी ५१ वर्षापुढील नागरीकाचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना तरुण युवकांसमोर मंडळी. त्यासाठी फक्त त्यांना सहकार्य हवे होते. कुठल्याच प्रकारचे राजकारण, भेदभाव न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा अवलंब करत समाजातील सर्व जाती धर्माच्या नागरीकाना आमंत्रित करून सर्वांना फेटे घालून व बॅड पथकाने त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बँड पथक आरिफ शेख यांनी उपलब्ध करून दिले.मिरवणुकीच्या सुरवातीला छत्रपती शिवाजीमहाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. भव्य मंडपात सर्व जेष्ठ नागरिकाचे औक्षण करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील तरूण सुध्दा मोठ्या उत्साहात सहभागी झाले. छत्रपती शिवाजीमहाराजाच्या पुतळ्यासमोर १० कीलोचा केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला कसमादे परीसरात इतक्या मोठ्या प्रमाणात गावातील १२५ नागरीकाचा वाढदिवस साजरा झाल्याची चर्चा सर्वत्र होत असुन आराई येथील सामाजिक कार्यकर्ते अश्विन आहिरे यांचे कौतुक देखील होत आहे. त्यानी सर्व समाजातील लोकांना एकत्रीत आणत असा कार्यक्रम साजरा केला. यावेळी ज्येष्ठांबरोबर ग्रामपंचायत लिपिक स्वप्निल अहिरे यांची भाची ईश्वरी बोरसे व गावातील योगेश अहिरे यांची कन्या ईशा अहिरे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
कार्यक्रमा प्रसंगी ज्येष्ठांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजपर्यंत आमचा वाढदिवस कोणीच साजरा केला नाही पण आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच केक कापुन वाढदिवस साजरा झाला अशा भावना काहीनी बोलुन दाखवल्या. त्यावेळी अनेकांचे डोळे भरून आले होते.
हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच की ह्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात, काहींना आपले जुने मित्र भेटतात, जुन्या आठवणी ताज्या होतात, सामाजिक सलोखा टिकून राहत समाजाप्रती आपली काहीतरी नैतिक जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होते.- आश्विन (गंपू) पाटील.
आम्ही लहान असायचो तेव्हा आम्हाला वाढदिवसाचे फारसे हायसे कधीच वाटले नाही. परंतु तरुण पिढी जेव्हा आपला वाढदिवस साजरा करतात तेव्हा आम्हालाही हेवा वाटतो की आपणही असा वाढदिवस साजरा करावा किंवा आपल्या मुलांनी साजरा करावा परंतु प्रापंचिक गरजा पूर्ण करण्यात व्यस्त असलेली पिढी या गोष्टी विसरायला लागली आहे परंतु आज आश्र्विनने त्यास सुरुवात करून आमच्यात नवचैतन्य निर्माण केले आहे. – धर्मराज आहिरे ज्येष्ठ नागरिक, आराई
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम