
देवळा : वरिष्ठ महाविद्यालयात रिक्त असलेल्या तब्बल 16 हजार जागा, 100% प्राध्यापक भरती न झाल्याने 20 ते 25 हजार सहाय्यक प्राध्यापकांवर तासिका तत्वावर अध्यापनाची आलेली वेळ समान काम समान वेतनाचा अभाव, विनाअनुदानित महाविद्यालयात कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची रखडलेली नियुक्ती, अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत्या 26 डिसेंबर पासून म्हणजेच परीक्षा काळात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

नाशिक सह नगर व पुणे जिल्ह्यातील 15 ते 16 हजार प्राध्यापक बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याने अगोदरच विद्यापीठाच्या लांबलेल्या परीक्षा पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.
उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांची 100% भरती करणे आवश्यक आहे या उद्देशानेच अनेक वर्षांपासून नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीकडून वारंवार शासन दरबारी प्रश्न मांडले आहेत परंतु शासनाने त्याचे गांभीर्य लक्षात न घेता अद्याप कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही याउलट दिरंगाई बरोबरच चुकीचे शासन निर्णय तासिका धारकांवर लादल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत परिणामी 100 टक्के प्राध्यापक भरती करता 27 ऑक्टोबरला पुणे येथील बैठकीत राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र शासन 2088 पदांची भरती करीत आहोत असे आश्वासन वारंवार देत आहे परंतु भरती प्रस्तावांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही तसेच पुढील भरतीस शासन परवानगी देत नाही या कारणामुळे पात्रता धारकांनी विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे.
या आंदोलनाचे निवेदन देवळा एज्युकेशन सोसायटीचे
अध्यक्ष व प्राचार्य हितेंद्र आहेर , प्रशासकीय अधिकारी डॉ. मालती आहेर यांना देण्यात आले. यावेळी प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी पात्रता धारकांच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी देवळा महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्रा. यशवंत खैरनार, प्रा. स्वप्नील गरुड,प्रा. महेश वळवी, प्रा.हेमलता निकम, प्रा. सविता पवार, प्रा.विजय अहिरे, प्रा. संदीप वळवी, प्रा.पद्मपाणी जगताप, प्रा. मोसिन मन्सुरी हे उपस्थित होते.
संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या
1) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करावी
2) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करावे
3) प्राध्यापक भरती वेळेत पूर्ण करण्याकरिता तात्काळ एनओसी दिल्या जाव्यात
4) विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती करावी
100 टक्के प्राध्यापक भरती करावी
मागील दहा ते बारा वर्षापासून प्राध्यापक भरती ही सुरळीत झालेली नसल्यामुळे आज महाराष्ट्रात 15 हजारांपेक्षा जास्त वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे शासनाने रिक्त असलेल्या जागांवर 100 टक्के भरती करावी
– प्रा. यशवंत खैरनार, सदस्य नेट – सेट पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम