सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील गिरणा नदीच्या पुलावर मंगळवार (दि. १४) रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास क्रेटा आणि स्विफ्ट या दोन चारचाकी तसेच १ स्कुटी व दुचाकी डिस्कवर अशा चार वाहनांचा झालेल्या विचित्र आणि भीषण अपघातात स्कुटी वरील दुचाकीचालक कळवण येथील स्थानिक असलेले सागर देवरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मयत सागर देवरे यांची पत्नी कावेरी देवरे हिलादेखील कमरेला जबर मार लागल्याने तिला सटाणा येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
Breaking news | फरार अद्वय हिरे अखेर पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान,याप्रकरणी स्कुटी चालकाचा तपास लागला असून मोटरसायकल आणि दोन्ही कार मधील व्यक्तींचा तपास अद्याप लागलेला नाही. दरम्यान, देवळा पोलीस या अपघाताबाबत पुढील तपास करीत आहेत.
अपघातामुळे गिरणा नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहने हलविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याबाबत देवळा पोलिसांनी अपघाताच्या घटनेचा गुन्हा दाखल केला असून, एपीआय दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास करण्यात येत आहे.
Nashik | श्री शिवमहापुराण कथेचा मंडप भूमिपूजन सोहळा संपन्न
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम