Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात चांगला दिवस बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात करोडोंचे नुकसान झाले मात्र पुन्हा बाजारात गतवैभव परतली असून जागतिक बाजारातून मिळालेल्या विशेष पाठिंब्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. देशांतर्गत सिग्नल्समधील हेवीवेट्सची वाढ बाजारासाठी आश्वासक ठरत आहे. टाटा समभाग आणि बजाज ट्विन्सच्या वाढीचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून येत आहे. (Stock Market Opening)
आज बाजार कसा उघडला ?
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार झाली असून सेन्सेक्सने त्रिशतक ठोकले आहे. BSE सेन्सेक्स 337 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 64,449 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला. NSE चा निफ्टी 92.05 अंकांच्या किंवा 0.48 टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह 19,232 च्या पातळीवर उघडला. (Stock Market Opening)
बँक निफ्टीने कमालीची वाढ दाखवली पण नंतर आलेख घसरला
बँक निफ्टीने आज 43356 चा उच्चांक गाठला होता पण आता सकाळी 9.30 वाजता तो दिवसभराच्या उच्चांकावरून 257 अंकांनी घसरून 43102 च्या पातळीवर दिसत आहे. तथापि, अनेक बँकिंग समभागांमध्ये तेजीचा कल कायम आहे आणि काही PSU बँक समभागांमध्ये वाढ होत आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स शेअर्सचे चित्र कसे होते?
सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग वाढताना दिसले आणि फक्त 4 घसरणीच्या श्रेणीत दिसले. टाटा मोटर्स 1.25 टक्क्यांनी आणि बजाज फिनसर्व्ह 0.90 टक्क्यांनी वाढलेले सर्वात मोठे शेअर्स आहेत. नेस्लेचे शेअर्स 0.65 टक्के आणि टाटा स्टील 0.60 टक्क्यांनी वधारले आहेत. (Stock Market Opening)
प्री-ओपनमध्ये बाजार कसा होता?
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या आधी बीएसई सेन्सेक्स 511 अंकांच्या किंवा 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 64623 च्या पातळीवर व्यवहार करत होता. यासह NSE चा निफ्टी 301.75 अंकांच्या किंवा 1.58 टक्क्यांच्या वाढीसह 19442 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Maratha Andoln: मराठ्यांचा वणवा पेटला…! आंदोलनाला हिंसक वळण! बीड-उस्मानाबादमध्ये कलम 144 लागू
काल अमेरिकन बाजारात मोठी वाढ
काल अमेरिकन बाजारांमध्ये प्रचंड वाढ दिसून आली आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेजने 511 अंकांच्या किंवा 1.58 टक्क्यांच्या उसळीसह 32,928 च्या पातळीवर व्यापार बंद केला. याशिवाय नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्सही 146 अंकांनी किंवा 1.16 टक्क्यांनी वाढून 12,789 च्या पातळीवर बंद झाला. S&P 500 निर्देशांक 1.2 टक्क्यांनी वाढला आणि 4166 च्या पातळीवर व्यापार बंद झाला. (Stock Market Opening)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम