आज स्टेफानिया मोरेचिनानुचा (Stefania Maracineanu) १४० वा वाढदिवस आहे. या प्रसंगी गुगुलने डूडलच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून त्यांचे डूडल तयार केले आहे. रेडिओअॅक्टिव्हिटी मध्ये संशोधन करणारी या महिलाहीची आज 140 वी जयंती आहे.
स्टेफानिया माराचिनानो चं शिक्षण फिजिक्स आणि केमिकल सायंस मधील आहे. भूकंप आणि पाऊस यामधील कनेक्शन शोधून त्यावरील पहिला रिपोर्ट स्टेफानिया माराचिनानो (Stefania Maracineanu) ने लिहला आहे.
स्टेफानिया मोरेचिनानु विषयी थोडक्यात माहिती :
स्टेफानिया मोरेचिनानु (Stefania Maracineanu) यांचा जन्म १८ जून १८८२ रोजी बुखारेस्ट येथे झाला. त्यांचे दहावीचे शिक्षण सेंट्रल स्कूल गर्ल्समध्ये झाले. १० वीचे शिक्षण घेत असताना त्यांना रोमानियाच्या विज्ञान मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती मिळाली आणि नंतर रेडियम संस्थेकडून पदवी संशोधन करण्यासाठी पॅरिसला गेल्या.
हे सुद्धा वाचा :-
नवाब मलिक, देशमुखांना धक्का ; मतदानाचा अधिकार नाहीच
त्यांनी बुखारोस्ट विद्यापीठातही प्रवेश घेतला. यानंतर, मॉरिसिनानु (Stefania Maracineanu) सॉर्बोन येथे रेडिओ एक्टिव्हिटीचा अभ्यासक्रम घेतला आणि १९२६ पर्यंत त्यांनी रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये मेरी क्युरी यांच्यासोबत संशोधन केले. पोलोनियमच्या संशोधनावर त्यांनी आपले अर्धे आयुष्य घालवले होते. त्यांच्या संशोधना दरम्यान, स्टेफानिया मोरेचिनानु यांनी कृत्रिम पावसावर संशोधन करण्यासाठी बराच वेळ घालवला. त्यासाठी त्या अल्जेरियाला गेल्या. स्टेफानिया यांनी भूकंप आणि पाऊस यांच्यातील संबंधाचा खूप बारकाईने अभ्यास केला होता.
दारूच्या नशेत असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून ६५ वर्षीय वृद्धमहिलेची हत्या
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम