‎देवळा | भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या राज्य संयोजक पदी ह. भ. प. संजय धोंडगे 

0
27

सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : देवळा | भारतीय जनता पार्टीच्या वतीने आध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केलेली असून यात नाशिकचे आचार्य तुषार भोसले यांची संयोजक पदी तर देवळा येथील संजय नाना धोंडगे यांची सहसंयोजक पदी निवड करण्यात आली.

Crime news | अखेर हिरेंची जेलवारी टळली; अटकपूर्व जामीन मंजूर
या निवडीनंतर नवनियुक्त सहसंयोजक संजय नाना धोंडगे म्हणाले की, देव तसेच देश आणि धर्मासाठी भाजप कार्य करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसविण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या सण २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वधर्म गुरू एकत्र येऊन जनजागृती करणार आहेत.

Nashik | दिवाळीत गावी जाणाऱ्यांची होतेय लूटमार; ज्यादा प्रवासभाडेबाबत करा तक्रार
भारतीय जनता पक्षासाठी आध्यात्मिक क्षेत्रातून मोठी ताकद आम्हीं उभी करणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या निवडीची घोषणा केलेली आहे. या पदाला आम्ही चांगला न्याय देऊ. तसेच राज्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आणि इतर प्रशासनातील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहून या पदाचा उपयोग आध्यात्मिक क्षेत्रासाठी करणार आहोत.

धोंडगे यांच्या नियुक्तीचे आमदार डॉ राहुल आहेर, जिल्हा नेते केदा नाना आहेर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, नगरसेवक जितेंद्र आहेर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण, तालुका अध्यक्ष अतुल पवार आदींसह जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here