सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील रघुनाथ हरी अमृतकार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च अखेर निव्वळ नफा ५१ लाख २१ हजार रुपये इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन भारत कोठावदे, व्हा. चेअरमन राजेंद्र अहिरराव यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती देतांना कोठावदे यांनी सांगितले की, संस्थेचे एकूण ११४८ सभासद असून, वसूल भागभांडवल १ कोटी ७७ लाख आहे. राखीव व इतर निधी ४ कोटी ८५ लाख, एकूण ठेवी १८ कोटी ५० लाख, कर्जवाटपात १५ कोटी ६ लाख, एकूण गुंतवणूक १० कोटी ६४ लाख, ढोबळ एनपीए २. ४० टक्के, नेट एनपीए प्रमाण ०% व सीआरआर १. ७ टक्के, निव्वळ थकबाकी १ . ८५ % इतकी अत्यल्प आहे. तर खेळते भाग भांडवल २६ कोटी ६५ लाख याप्रमाणे आहे.
Deola | किशोर सूर्यवंशी पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रमोद पाटील यांची बिनविरोध निवड
याप्रसंगी संस्थापक चेअरमन भारत कोठावदे, व्हा. चेअरमन राजेंद्र अहिरराव, कार्य. संचालक रोहन वडनेरे, संचालक भूषण कोठावदे, संजय अहिरराव, सुनिल आहेर, राजेंद्र धामणे, देविदास ब्राह्मणकर, नितीन लाडे, किशोर सोनवणे, संचालिका जयश्री मुसळे, भारती जाधव, मॅनेजर दावल आहेर, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिनकर, उपाध्यक्ष नानाजी आहेर, प्रदिप धांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, या सहकारी पतसंस्थेच्या मंगळवारी दि. ८ रोजी देवळा शाखेच्या २२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नानाजी आहेर यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी संस्था कार्यालयात सहकार व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम