नाशिकच्या प्रवाशांनी एसटी महामंडळाला दिला झटका, ८० रुपयांचे आता ८ हजार द्यावे लागणार 

0
13
st news

नाशिक : एसटीचे ऑनलाईन तिकीट काढूनही प्रवासादरम्यान प्रवाशाकडून अतिरिक्त पैसे वसूल करणे एसटी (ST Bus) महामंडळाला आता चांगलेच महागात पडले आहे. प्रवाशाच्या तक्रारीवरून ग्राहक आयोगाने एसटी महामंडळाला धारेवर धरले असून प्रवाशाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी नाशिकहून अहमदाबादसाठी आकाश शिरोरे नावाच्या एका  युवकाने प्रवास केला होता. यावेळी त्याने प्रवास करण्यासाठी बसचे सीट रिझर्व करूनही त्याच्याकडून अतिरिक्त ८० रुपये शुल्क आकारले, याचा फटका एसटी महामंडळाला बसला (ST Bus) आहे. ग्राहक तक्रार आयोगाने प्रवासाला झालेला मानसिक त्रास आणि अर्जाचा खर्च असे एकूण आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश महामंडळाला दिला आहे.

हे सुद्धा वाचा : 

आजचे राशी भविष्य बघा कसा असेल दिवस

नाशिक येथील आकाश शिरोरे हा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचा विद्यार्थी असून नोव्हेंबर २०१९ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST Bus) अनुचित व्यापार प्रथेविरुद्ध झालेल्या त्रासाची तक्रार देत पन्नास हजार रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती.

आकाश शिरोरे यांच्या म्हणण्यानुसार १२ सप्टेंबर २०१९ रोजी आकाशाने महामंडळाच्या बसचे (ST Bus) स्लीपर रेडबस अँपवरून नाशिक ते अहमदाबाद असे तिकीट बुक केले होते. दि.१३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष प्रवास करताना कंडक्टरने बुक केलेल्या सीटवर अधिभार शुल्क ८० भरावा लागेल असे सांगितले. यानंतर शिरोरे यांनी अतिरिक्त शुल्क भरून प्रवास केला.

दरम्यान या प्रकारानंतर शिरोरे यांनी महामंडळाच्या ऑनलाईन वेबसाईटवर तक्रार दाखल केली होती. तसेच आगार व्यवस्थापक आणि विभागीय नियंत्रक यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली होती. मात्र अधिभाराबाबत कोणतेही स्पष्टीकरण संबंधितांकडून न मिळाल्याने त्याने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. ग्राहक आयोगाला घटनेची सविस्तर (ST Bus) माहिती दिली.

या प्रकरणी आयोगाने एसटी महामंडळास नोटीस बजावली. मात्र ग्राहक आयोगाने बजावलेल्या नोटीसला महामंडळाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने ग्राहक तक्रार आयोगाने तक्रारकर्ता शिरोरे यास नुकसान भरपाई देण्याचे आदेश एसटी महामंडळाला (ST Bus) दिले आहेत.

 

धक्कादायक! 10 वर्षीय मुलाने केली आईची कुऱ्हाडीने वार करुन हत्या


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here