मुंबई, 24 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तिढा सोडण्यासाठी राज्य सरकार एक पाऊल पुढे आलं आहे. परिवन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांची विविध कॅटेगिरीनुसार अडीच हजार ते पाच हजार पगारवाढीची घोषणा केली. पण राज्य सरकारच्या या घोषनेनंरही एसटी कर्मचारी मागे हटण्याच्या भूमिकेत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव जरी मान्य झाला असला तरी विलीनीकरण हीच प्रमुख मागणी आहे. केवळ पगारवाढीच्या मुद्द्यावर कामबंद आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका पुण्यातील शिवाजीनगर डेपोतील एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.
राज्य सरकारने पगारवाढीची जी घोषणा केली ती खरंतर 2012 सालीच होणे अपेक्षित होतं. विलीनीकरणाची घोषणा झाली नाही तर कामबंद आंदोलन सुरुच ठेवणार, अशी घोषणा कर्मचाऱ्यांनी केली.
राज्य सरकारच्या पगारवाढीवर एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नाही. सोलापूर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी केळं दाखवत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सोलापुरातूनच सुरुवात झाली होती. अनिल परब यांनी जे जाहीर केलं आहे ते आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना मान्य नाही. आमचा मुळ मुद्दा हा विलीनीकरण हा आहे. विलीनीकरणाचा मुद्दा सोडून ते दुसऱ्याच मुद्दावर बोलत आहेत. आम्ही पगारवाढीचं फक्त बोलत नाही आहोत. आम्ही विलनीकरणही मागत आहोत. पण हा विलीनीकरणाचा मुद्दा सोडून आमचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सोलापूर आगाराचे कर्मचारी हे सरकारला केळं दाखवून सरकारच्या निर्णयाचा निषेध करत आहोत”, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम