10 वी चा निकाल याच महिन्यात लागणार; पहा काय असू शकते तारीख

0
6

द पॉईंट नाऊ ब्युरो : बारावीच्या निकालाची प्रतिक्षा सर्वांना होती. आणि तो आज लागला. आता उत्कंठा लागली आहे ती दहावीच्या निकालाची. आणि हा दहावीचा निकाल याच महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल याच महिन्यात लागेल असे म्हटले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच प्रकारचे शिक्षण हे ऑनलाईन झाले होते. त्यामुळे यावेळी ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर निकालासाठी सर्वांचे लक्ष लागले होते. यात आज राज्यात बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला. आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांना आहे.

दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष आहेत. त्यामुळे या दोन्ही इयत्तांच्या निकालाकडे विद्यार्थी वर्गासह पालक, नातेवाईक सर्वांचेच लक्ष असते. आता दहावीचा निकाल हा या महिन्याच्या 15 ते 20 तारखेदरम्यान लागणार असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली आहे. दहावीच्या परीक्षेत काय निकाल लागतो? कोण बाजी मारते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात किती विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेस बसले होते?

मार्च महिन्यात पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेला जवळपास 23 हजार शाळांमधून सुमारे 16 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आणि या परीक्षा 21 हजाराहून अधिक परीक्षा केंद्रांवर पार पडल्या होत्या. बऱ्याच कालावधीनंतर विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेस सामोरे जाणार असल्याने, विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे कसलेही दडपण नको या कारणाने पेपरच्या मध्ये विशिष्ट खंड ठेवण्यात आला होता. तर या परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे आणि 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटे वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेत सोयीस्कर वेळ देखील प्राप्त झाला होता. म्हणून आता या परीक्षेच्या निकालाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दहावी बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असल्यामुळे सर्वांना या परीक्षेच्या निकालाबाबत मोठी उत्कंठा आहे. आजच बारावीचा निकाल लागला आहे. आणि आता दहावीचा निकाल याच महिन्यात लागणार असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कधी एकदा निकालाची तारीख येते, कधी निकाल जाहीर होतो याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. आता निकाल काय लागतो हे लवकरच स्पष्ट होईल आणि विद्यार्थी आपल्या भविष्याच्या दृष्टीने योग्य ते प्लॅनिंग करू शकतील आणि पाऊले उचलू शकतील.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here