जळगाव : श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयां तर्फे २५ सप्टेंबर राष्ट्रीय फार्मासीस्ट दिनाचे औचित्य साधून बांभोरी गावात जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेस डॉ. जी. के. पटनाईक, प्राचार्य डॉ. अमोल लांडगे, यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
दरम्यान विद्यार्थ्यांनी औषध संदर्भात जनजागृती करणारे फलक तयार केले. पदयात्रेस महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी सौ. अपर्णा लाड, श्री. वसिम शेख, सौ. प्रणिता चौधरी, सौ. अंकिता घाडगे, सौ. निकीता पाटिल, श्री. कल्पेश सोनवणे, सौ. दिपीका ईटनारे, श्री. अनिस शेख, पुनम चौरे, सोनम जयस्वाल, श्री. मंगलसिंग राजपूत इ. उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधुन विविध औषधांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली. तसेच शिक्षकांनी १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. पदयात्रेचे विसर्जन बांभोरी ग्रामपंचायत येथे झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम