Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…

0
38

Spiritual news |  १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या (ujjain) मंदिरात बाबा काल भैरवांच्या दर्शनासाठी देश – विदेशातून लोक येतात. हे भक्त त्यांच्या मनातील इच्छा घेऊन याठिकाणी पूर्ण श्रद्धाभावाने नतमस्तक होतात. तर काही लोक हे त्यांना दु:खापासून मुक्ती मिळावी.

यासाठी तर काही अज्ञात भीतीपासून मुक्ती मिळावी. याशिवाय महाकाल बाबांचा आशीर्वाद हा शत्रूपासून मुक्त होण्यासाठी तसेच त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठीही खूप प्रभावी असतो. उज्जैनच्या या मंदिराविषयी एक रंजक व चमत्कारिक रहस्य म्हणजे ह्या मंदिरात असलेली कालभैरवची मूर्ती ही मद्याचे सेवन करते.

 बाबा महाकाल हे भगवान शिवाचे रुद्र अवतार असून, भैरव म्हणजे मनातील भीती दूर करणारा. भगवान शिवाच्या काल भैरव  ह्या अवताराला काशीचा कोतवाल असेही म्हटले जाते. काशीच्या व्यतिरिक्त उज्जैनचे कालभैरव मंदिर हे जग प्रसिद्ध आहे.

उज्जैनच्या (ujjain) कालभैरव मंदिराच्या एका चमत्कारामुळे ते अत्यंत प्रसिद्ध आहे. ह्या महकाल ज्योतिर्लिंग मंदिरात  काल भैरवाला चक्क मद्य अर्पण केले जाते. येथे कालभैरवांच्या पूजेच्या साहित्यात मद्य हा महत्त्वाचा नैवेद्य असतो. कालभैरवांना मद्य अर्पण करण्यामागील कारण व माहात्म्य जाणून घेऊयात.

Big Offer! ‘या’ आलिशान SUV वर मिळतेय 11.85 लाखांची तगडी सूट

मद्याचा नैवेद्य का दाखवतात?

कालभैरव हे दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी मद्याचे सेवन करतात असे सांगितले जाते. त्यामुळे उज्जैनच्या (ujjain)ह्या मंदिरात कालभैरव देवाला मद्य अर्पण केले जाते. यापूर्वी या मंदिरात कालभैरव देवाला मद्यासोबत मांसदेखील अर्पण केले जायचे. परंतु,  नंतर फक्त मद्य अर्पण करण्याची पद्धत सुरू राहिली. कालभैरवाच्या ह्या मंदिरात मद्य अर्पण करणे हे देखील दृढनिश्चय तसेच शक्तीचे प्रतिक मानले जाते. येथे लोक मद्य देतात, मात्र ते प्रसाद म्हणून सेवन करत नाहीत. या मंदिरात भक्तांकडून दररोज सुमारे २००० मद्याच्या बाटल्या अर्पण केल्या जातात.

मंदिरातील मूर्ती पिते मद्य

उज्जैनच्या (ujjain) ह्या जगप्रसिद्ध मंदिरात कालभैरवाच्या म्हणजेच महाकाल बाबाच्या दर्शनासाठी देश विदेशातून लोक येतात.   या मंदिराविषयी एक रंजक आणि चमत्कारिक तथ्य म्हणजे या मंदिरात असलेली कालभैरवची मूर्ती मद्याचे सेवन करते. नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक शिवाच्या ह्या रुपयाची विशेष पूजा करतात.

दरम्यान, उज्जैनच्या ह्या मंदिरातील मूर्ती ही मद्य कसे पिते हे एक रंजक रहस्य असून, पुरातत्व विभाग तसेच शास्त्रज्ञही हे रहस्य शोधण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे हे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. भगवान कालभैरवाच्या ह्या मंदिरात दर रविवारी मद्य अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. कालसर्प दोष, अकाली मृत्यू तसेच पितृदोष यांसारख्या घातक दोषांपासूनही यामुळे आराम मिळतो.

Infotech news | थांबा..! एक QR Code Scan करताना ही काळजी घ्या, नाहीतर…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here