स्पेलिंग बी स्पर्धेत देवळा येथील कार्तिक प्रथम

0
51
देवळा विद्यानिकेतचा विद्यार्थी कु कार्तिक मेघावत याला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करताना। पालकमंत्री दादा भुसे समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल ,गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव आदी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : तालुक्यात घेण्यात आलेल्या स्पेलिंग बी स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम आलेल्या देवळा येथील जि. प. च्या विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थी कार्तिक हेमंत मेघावत याला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुक्रवारी दि ३० रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

देवळा विद्यानिकेतचा विद्यार्थी कु कार्तिक मेघावत याला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करताना। पालकमंत्री दादा भुसे समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल ,गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव आदी
(छाया – सोमनाथ जगताप)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या संपादनुकीसाठी व शब्दसंग्रह वाढीसाठी उपयुक्त अशी ‘स्पेलिंग बी “स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एकूण 64 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता . जिल्हा परिषद चषक स्पर्धेच्या धर्तीवर प्रथम शाळास्तर नंतर केंद्र स्तर आणि शेवटी तालुकास्तर अशा वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा आयोजित करून तालुकास्तरावरील प्रत्येकी आठ विद्यार्थी हे जिल्हास्तरावरील मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले .

यात इयत्ता सातवी व आठवी मोठ्या गटात देवळा विद्यानिकेतन शाळेतील कार्तिक हेमंत मेघावत याने प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल कु कार्तिक याला नाशिक येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदींसह
गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव , केंद्रप्रमुख उखा सावकार ,सुभाष शिंदे ,मनीष गवळी, घनश्याम बैरागी, किरण पाटील ,अनुराधा शिंदे ,प्रकाश ह्याळीज ,महेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here