मुंबई : आजकाल आपल्या सर्वांचे स्टेट बँकेत किंवा अन्य बँकेत अकाउंट असते. पण तुम्ही विविध व्यवहारांसाठी जर कोणतेही बँकिंग अॅप वापरत असाल, किंवा ते अॅप डाऊनलोड करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
या सोवा मालवेअरमुळे तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे उडू शकतात. तसेच, बँकिंग अॅपच्या माध्यमातून हे सोवा मालवेअर तुमच्या फोनमध्ये प्रवेश करेल व तुमच्या रक्कम आणि अन्य किमती मालमत्तांवर डल्ला मारु शकतो, असा इशारा भारतीय स्टेट बँकेने सर्व ग्राहकांना दिला आहे. याआधी कॅनरा बँकेनेही त्याच्या ग्राहकांना अश्याच प्रकारची सूचना दिली आहे. ही सूचना विशेषकरून अॅन्ड्राईड फोन वापरकर्त्यांसाठी आहे.
Don't let malware steal your valuable assets. Always download the trusted apps from reliable sources only. Stay Alert and #SafeWithSBI#SBI #AmritMahotsav #CyberSafety #CyberSecurity #StayVigilant #StaySafe pic.twitter.com/NwAfUle36V
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 22, 2022
काय आहे सोवा मालवेअर ?
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोवा हे असे बँकिंग ट्रोजन मालवेअर आहे. जे तुमच्या बँक खात्याशी संबंधित वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी विविध बँकिंग अॅप्सना लक्ष्य करते. म्हणजेच तुमच्या बँकिंगशी संबंधित सर्वप्रकारची गुप्त माहिती या वायरसद्वारे चोरली जाते. ज्यावेळी तुम्ही कोणतेही नेट-बँकिंग अॅप्स वापरता आणि तुमच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करतात, तेव्हा हा मालवेअर तुमचे क्रेडेन्शियल रेकॉर्ड घेत असतो. विशेष म्हणजे, एकदा जर हे इन्स्टॉल झाला, तर ते अनइन्स्टॉल करणे अवघड बनते.
असे काम करते सोवा मालवेअर
सुरुवातीला एका फेक मॅसेजच्या माध्यमातून हे ट्रोजन तुमच्या फोनमध्ये अपोआप इन्स्टॉल होते. त्यानंतर हे ट्रोजन तुमच्या सध्याच्या सर्व अॅप्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवते. नंतर हॅकर्स कमांड आणि कंट्रोलच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्ये एक व्हायरस पाठवतो. त्याचसोबत एक यादीही पाठवली जाते, ज्यात टार्गेट करण्यात येणाऱ्या अॅप्सची सर्व माहिती असते. जर या अॅपचा तुम्ही वापर केला तर हा व्हायरस त्या अॅपचा डेटा एक्सएमएल फाईलमध्ये स्टोअर करते, आणि त्याचा अॅक्सेस हॅकर्सला सहज मिळतो.
अशावेळी आपण काय काळजी घ्यायला हवी ?
एकदा का जर हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आला, तर त्याला बाहेर काढणे अवघड होऊन बसते. त्यामुळे तुम्हाला या अॅप्सपासून वाचायचे असेल तर खबरदारी घेणे महत्वाची आहे. त्यासाठी काहीच नाही करायचे, फक्त गुगल प्ले स्टोरवरूनच सुरक्षेची पक्की खात्री असलेलेच अॅप डाऊनलोड करा. पण हे अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा संपूर्ण रिव्ह्यू वाचा. तसेच, अॅप डाऊनलोड करताना हे अॅप कोणत्या गोष्टींना परवानगी देता, याची तुम्ही खात्री करा. तसेच अनोळखी वेबसाईटस् ला भेट देणे शक्यतो टाळाच.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम