आईची गळा आवळून हत्या करत मुलाची आत्महत्या

0
12

द पॉईंट नाऊ ब्युरो : सांगली जिल्ह्याच्या आष्टा येथे मुलाने स्वतःच्या आईला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शशिकांत कांबळे असे मृत मुलाचे नाव असून ते 47 वर्षांचे आणि त्यांच्या आई रतन कांबळे या 80 वर्षांच्या होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, शशिकांत हे दम्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचा हा आजार काही केल्या बरा होत नसल्याने ते तणावात होते. मात्र अखेर त्यांनी हार मानून हे टोकाचे पाऊल उचलले.

आपल्या नंतर आपल्या आईचा सांभाळ कोण करणार, या विचाराने शशिकांत यांनी आधी आपल्या आईची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.

शशिकांत हे आष्टा येथे वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. शशिकांत यांचे आई आणि वडील दोघेही शिक्षक होते. त्यांच्या वडिलांचा काही काळापूर्वीच मृत्यू झालेला होता.

पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असतांना, शशिकांत यांनी आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली आणि नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.
आष्टा येथे घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here